धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

file photo
file photo

दर्यापूर (जि. अमरावती) ः आपल्या शालेय मित्रांसोबत धरण प्रकल्पावर सहलीसाठी गेलेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दर्यापूर तालुक्‍यातील हिंगणी मिर्झापूरनजीक पूर्णा नदीच्या धरण प्रकल्पावर घडली. यश राजेश भांडे (वय 17) रा. चांदखेड, असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
तालुक्‍यातील चांदखेड येथील रहिवासी असलेला यश भांडे हा तालुक्‍यातील सामदा येथील महर्षी वाल्मीकी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 12 वीच्या सायन्स शाखेचा विद्यार्थी होता. दर्यापूर येथील खरेदी-विक्री समिती परिसरात भाड्याने खोली करून सामदा येथे शिक्षणासाठी तो ये-जा करीत होता. शुक्रवारी आषाढी एकादशीनिमित्त शाळेला सुट्टी असल्यामुळे यश आणि त्याच्या मित्रांनी दर्यापूरवरून जवळच असलेल्या हिंगणी येथील पूर्णा नदीवरील धरण प्रकल्पावर जाण्याचा बेत आखला. दुपारी बारादरम्यान 7 ते 8 मित्रांसोबत यश तिथे गेला. मित्रांसोबत पाण्यात उतरल्यावर यश पाय घसरून खोल पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर बाजूच्या शेतात असलेल्या प्रशांत गावंडे आणि वेदांत गावंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती दर्यापूर पोलिसांना दिली. शेतकरी कुटुंबातील असलेल्या यशच्या दुर्दैवी मृत्यूमुळे चांदखेड गावात शोककला पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com