विजेच्या धक्‍क्‍याने विद्यार्थ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

तुमसर : शिकवणी वर्गात गेलेल्या विद्यार्थ्याचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.28) घडली. शृखंल प्रशांत काळबांडे असे मृताचे नाव आहे. शृंखल हा मातोश्री विद्यामंदिर येथे अकराव्या वर्गात शिकत होता. सकाळी तो गायडन्स पॉइंट ट्यूशन क्‍लास येथे खासगी शिकवणी वर्गात गेला होता. दरम्यान, लघुशंकेसाठी तो इमारतीच्या वरच्या भागात मित्रांसोबत गेला होता.
इमारतीजवळूनच अकरा केव्ही उच्च दाबाची लाइन गेली आहे. मोबाईलवर बोलत असल्याने विजेच्या उच्च दाबाच्या संपर्कात आल्याने जबर झटका बसून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a student due to electric shock

टॅग्स