file photo
file photo

सर्पदंशाने एकाच गावातील दोघांचा मृत्यू

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील पिंपळगाव येथे शुक्रवारी (ता. 12) एकाच दिवशी दोघांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. मृतांत एका वृद्धेचा आणि अकरा वर्षीय बालकाचा समावेश आहे. दोन्ही घटना अर्ध्या तासाच्या अंतराने घडल्या. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सीताबाई श्रीराम सोनवणे (62) घरकाम करीत होती. डब्यातून तांदूळ काढायला गेली. तेव्हा डब्यामागे दडून बसलेल्या विषारी सापाने तिच्या उजव्या हाताला दोनदा चावा घेतला. त्यावेळी घरी कुणीच नव्हते. सोबतच तिला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध झाली नाही. त्यामुळे रुग्णालयात नेण्यासाठी बराच उशीर झाला. रुग्णालयात पोहोचल्याक्षणी डॉक्‍टरांनी सीताबाईला मृत घोषित केले. दुसऱ्या घटनेत बंटी प्रेमदास फुलबांधे (वय 11) घरामागील खताच्या ढिगाऱ्यावर शौचास गेला. तेव्हा त्याला विषारी सापाने दंश केला. तो धावतच घरी आला आणि वडिलांना सांगितले. त्याला तत्काळ ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पिंपळगावात या दोन्ही घटना अर्ध्यातासाच्या अंतराने घडल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com