अंत्यदर्शनाला गेलेल्या महिलेचा मृत्यू

विमल भोयर
विमल भोयर

कुही (जि. नागपूर) : तालुक्‍यातील राजोला सर्कलअंतर्गत येणाऱ्या कुजबा टाकळी येथे शुक्रवारी (ता. 26) अंत्यदर्शनाला गेलेल्या विमल रमेश भोयर (40) यांचा मृत्यू झाला. तसेच नऊ महिला जखमी झाल्याची माहिती आहे.
कुजबा टाकळी येथील रहिवासी अशोक भोयर यांचा मुलगा आशीष भोयर याचा 18 जुलैला देवळी कला मार्गावर दुचाकीने अपघात झाला. जखमी झाल्याने त्याला नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गुरुवारी रात्री आशीषचा मृत्यू झाला. आशीषचा मृतदेह टाकळी येथे शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आणण्यात आला. याची माहिती मिळताच नातेवाईक व गावकऱ्यांनी गर्दी केली. यावेळी काही महिला पायऱ्यांवर उभ्या होत्या. बांधकाम नवीन व कच्चे असल्याने पायऱ्यांची भिंत कोसळल्याने दहा महिला दबल्या गेल्या. त्यांना त्वरित रुग्णालयात पाठवले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना नागपूरला हलविले. मात्र, वाटेत विमल भोयर यांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये गोदाबाई जयपाल खराबे (55), राधाबाई किसन ईश्‍वरकर (65), शकुंतला महादेव डोळस, रत्नमाला मनोहर रामटेके (38), आचल रमेश भोयर (16), मेधा छबीलाल नानवटकर (17), मोनिका युराज भोयर (21), सोनू युवराज भोयर (20), निकिता दिलीप ठवकर (17) आदींचा समावेश असल्याची माहिती टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते खराबे यांनी दिली. या घटनेमुळे टाकळी गावात शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com