डिसेंबरमध्ये मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

अमरावती - ऍट्रॉसिटी कायद्यात बदल, मराठा आरक्षण, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा आणि स्वामिनाथन आयोगासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाज महाराष्ट्रतर्फे 14 डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यव्यापी मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात शुक्रवारी झालेल्या राज्यव्यापी बैठकीत समन्वय समितीतील प्रतिनिधींच्या
उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 

मराठा क्रांती मोर्चाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी 14 डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाच्या नियोजनाबाबत अमरावतीत शुक्रवारी मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात राज्यव्यापी बैठक घेण्यात आली. देशमुख सभागृहात झालेल्या राज्यव्यापी बैठकीत राज्यातील 30 जिल्ह्यातील जवळपास तीनशेवर प्रतिनिधी सहभागी झाले होते. या बैठकीत नागपूर येथे होणाऱ्या राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चासंदर्भात सूक्ष्म नियोजन करण्यात आले. 

या वेळी प्रत्येकच जिल्ह्यातील समन्वय समितीतील एका सदस्याला आपले मत मांडण्याचा वेळ देण्यात आला होता. विविध जिल्ह्यांतून आलेल्या समन्वय समितीतील सदस्यांनी आपापले मत मांडून नागपूर येथील मोर्चा कशाप्रकारे यशस्वी करता येईल, यासाठी सूचना केल्या. 

मोर्चाबाबत बंदद्वार चर्चा 
या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील एका प्रतिनिधीला बोलण्यासाठी वेळ देण्यात आला. सर्व जिल्ह्यांनी माहिती दिल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील एक सदस्य याप्रमाणे मोर्चाबाबात राज्यव्यापी बंदद्वार चर्चा करण्यात आली.

बैठकीत झालेल्या नियोजनाबाबत उपस्थित सदस्यांना बैठकीत ठरलेल्या नियोजनाची माहिती देण्यात आली. 14 डिसेंबरला नागपूर येथे काढण्यात येणारा राज्यव्यापी मोर्चा कशाप्रकारे यशस्वी करता येईल, यासंदर्भात अवास्तव चर्चा न करता आचारसंहितेचे पालन करत थेट मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. सात मिनिटांसाठी प्रतिनिधींना देण्यात आलेल्या वेळात अवास्तव चर्चा टाळत मोर्चाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. 

..तर चक्का जाम आंदोलन 
नागपूर येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चात मराठा-कुणबी समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रभर ज्याप्रमाणे क्रांती मूकमोर्चे काढण्यात आले, त्याचप्रमाणे राज्यभर चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यानंतर आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी मुंबईत मोर्चा काढला जाईल. दरम्यान, चक्का जाम आणि मुंबई मोर्चाबाबत सध्या कुठलेही नियोजन ठरविण्यात आलेले नाही. नागपूर येथे निघणाऱ्या मोर्चासंदर्भातच नियोजन करण्यात आले. 

Web Title: In December, Maratha-kunbi kranti muk morcha