सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगावात राष्ट्रवादी; देवरीत भाजपचा नगराध्यक्ष

बुधवारी नगराध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली
नगर पंचायतींचे शिलेदार ठरले
नगर पंचायतींचे शिलेदार ठरलेनगर पंचायतींचे शिलेदार ठरले

गोंदिया : जिल्ह्यातील सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व देवरी या नगर पंचायतींची निवडणूक (Decided the head of Nagar Panchayat) नुकतीच पार पडली. बुधवारी (ता. १६) नगराध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली. यात सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगावात राष्ट्रवादी काँग्रेस तर देवरीत भाजपचा नगराध्यक्ष होणार असल्याचे ठरले आहे. उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर दुपारी तीननंतर अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

सडक अर्जुनी येथे १७ प्रभाग असून, सर्वाधिक सात नगरसेवक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (Nationalist congress party) निवडून आले आहेत. येथे इतर पक्षांनी समर्थन दिल्यामुळे महाविकास आघाडी तयार करण्यात आली. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे तेजराम किसन मडावी यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची नगराध्यक्षपदासाठी वर्णी लागली आहे. येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे.

नगर पंचायतींचे शिलेदार ठरले
मी मास्का काढून भाषण केलेलं कधी पाहिलं आहे का?

तेजराम मडावी प्रभाग क्रमांक चारमधून निवडून आले. या नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (Nationalist congress party) सात, काॅंग्रेस दोन, शिवसेना चार व अपक्ष एक अशा १४ नगरसेवकांनी मिळून महाविकास आघाडी तयार करण्यात आली. तेजराम मडावी हे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ब्रह्मपुरी येथे गटनिदेशक (फोरमेन) या पदावर कार्यरत होते. ते ३० नोव्हेंबर २०१६ सेवानिवृत्त झाले. सेवेत कार्यरत असताना तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतरदेखील त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले होते.

देवरी येथील नगरपंचायतीचे (Nagar Panchayat) अध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी (सर्वसाधारण) राखीव असल्याने नगरपंचायतीच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आलेले प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार संजू शेषलाल उईके यांची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकूण १७ जागांपैकी ११ जागा जिंकून भाजपने बहुमत प्राप्त केले आहे.

नगर पंचायतींचे शिलेदार ठरले
Video Reel : लाईक्स, कमेंट्सच्या चक्करमध्ये गेला चार मित्रांचा जीव

राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सोडत काढल्यानंतर येथील अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी (सर्वसाधारण) निघाले आहे. अध्यक्षपदासाठी संजू शेषलाल उईके हे एकमेव उमेदर आहेत. संजू उईके हे दुसऱ्यांदा निवडून आले असून, ते मनमिळावू व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. अर्जुनी मोरगाव येथील नगराध्यक्षपदाची माळ राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मंजुषा वीरेंद्र बारसागडे यांच्या गळ्यात पडली आहे. सर्वसाधारण महिलेसाठी खुला असलेल्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून (BJP) ममता अरुण भैय्या व ललिता देवेंद्र टेंभरे, काॅंग्रेसकडून दिव्या महेश पशीने तर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून मंजुषा वीरेंद्र बारसागडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

परंतु, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मंगळवारी शेवटच्या दिवशी ऐनवेळी ममता भय्या, ललिता टेंभरे आणि दिव्या पशीने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मंजुषा बारसागडे यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. १७ सदस्य असलेल्या या नगरपंचायतीमध्ये भाजप सात, काॅंग्रेस चार, राष्ट्रवादी काँग्रेस चार, शिवसेना एक व अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नव्हते, हे येथे उल्लेखनीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com