खडसेंच्या अर्जावर आज निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

नागपूर - भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी सौरभ राव व भूषण गगराणी या सनदी अधिकाऱ्यांच्या साक्षी नव्याने घेण्याच्या एकनाथ खडसे यांच्या अर्जावरील सुनावणी बुधवारी टाळली. न्या. झोटिंग समितीने यावर निर्णय आज (ता. 2) देण्यात येईल, असे सांगून आजचे कामकाज स्थगित केले. 

भोसरी येथील एमआयडीसी भूखंड गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्या. दिनकर झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान खडसे यांनी मंगळवारी एक अर्ज दाखल केला. यात पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्या साक्षी नव्याने घेण्याची मागणी केली आहे. या अर्जावर निर्णय आज अपेक्षित होता. सकाळी 11 वाजता समितीचे कामकाज सुरू झाल्यानंतर खडसे यांच्या अर्जावर गुरुवारी निर्णय देण्यात येईल, असे न्या. झोटिंग यांनी खडसे यांच्या वकिलांना सांगितले. 

Web Title: The decision on the khadase application