दीक्षाभूमी शांतीचे प्रतीक - ओमप्रकाश रावत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नागपूर - मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी पवित्र दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील अस्थी कलशाला अभिवादन करून, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन केले. दीक्षाभूमी परिवर्तनाची भूमी असून, शांतीचे प्रतीक आहे. येथे येऊन मी धन्य झालो, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी नोंदवली. 

नागपूर दौऱ्यावर आले असता रावत यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी त्यांना भारतीय संविधान तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. रावत यांनी डॉ. आंबेडकर दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे विचार आजही जसेच्या तसे लागू पडतात. भारतीय संविधान निर्मिती हे त्यांचे अमूल्य असे देशाला दिलेले योगदान आहे. यामुळेच भारत प्रगतीकडे झेप घेत आहे. भारतीय संविधानातील लोकशाहीवर दृढ विश्वास असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी निवडणूक आयोगाचे महासंचालक धीरेंद्र ओझा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विन कुमार, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, एन. आर. सुटे, शिरीष मोहोड, प्रियदर्शनी बोरकर, आभा बोरकर, प्राचार्य डॉ. पी. सी. पवार, विजय गजभिये, शरद मेश्राम, देवा रंगारी, आशिष द्विवेदी उपस्थित होते.

Web Title: Deekshabhoomi peace symbol says Om Prakash Rawat