पडताळणीला विलंब, शिष्यवृत्ती लांबणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

चंद्रपूर : शिष्यवृत्तीचे अर्ज पडताळणी प्रक्रियेमधील पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम (पीएफएमएस) व नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांच्या स्तरावर विलंब होत आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती वितरणामध्ये विलंब होत असून याबाबत स्थानिक विद्यार्थी आणि पालक संघटना यांना महाविद्यालय प्रशासनाने अवगत करून आश्‍वासित करावे, अशा सूचना सहायक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी सर्व महाविद्यालयांना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सहायक आयुक्तस्तरावरून विद्यार्थ्यांच्या अर्जाला ऑनलाइन मान्यता प्रदान केलेली आहे. समाजकल्याण आयुक्तालयाचे आयुक्त यांच्या स्तरावरून विद्यार्थ्यांच्या अर्जाला मान्यता प्रदान केल्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम पीएफएमएस व एनपीसीआय या केंद्रीभूत वितरण प्रणालीमधून विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या बॅंक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते. परंतु, राज्यस्तरावरील पीएफएमएस व एनपीसीआय यांच्या स्तरावरून तपासणी प्रक्रियेत विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत समाजकल्याण आयुक्त पुणेमार्फत माहिती तंत्रज्ञान संचालनालयास वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. तरी याबाबत जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालय, प्रशासनाने स्थानिक सर्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थी तसेच पालक संघटनांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही यासाठी त्यांना याबद्दल कळवावे व आश्‍वासित करावे, असे आवाहन सहायक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delay in verification, scholarships will be delayed