esakal | "अहो सर आधी स्वाक्षरी करा".. विद्यार्थी आणि नागरिकांवर असे म्हणण्याची का आली वेळ.. वाचा सविस्तर 
sakal

बोलून बातमी शोधा

Delay in work sign of documents od people and students  in bhandara

मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख यांचे स्थानांतरण झाल्याने त्याच्या जागी देवदास बोंबुर्डे तहसीलदार म्हणून मे महिन्याच्या शेवटी येथे रुजू झाले. तहसील कार्यालयात सर्वच कामे ऑनलाइन होत असल्याने डिजिटल स्वाक्षरीनेच प्रमाणपत्र दिले जाते.

"अहो सर आधी स्वाक्षरी करा".. विद्यार्थी आणि नागरिकांवर असे म्हणण्याची का आली वेळ.. वाचा सविस्तर 

sakal_logo
By
भगवान पवनकर

मोहाडी (जि. भंडारा) : विविध कामासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रांसाठी दोन हजारांवर प्रकरणे तहसील कार्यालयात पडून आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तहसीलदारांच्या डिजिटल स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत प्रमाणपत्र अडले असून नागरिकांसह व शालेय विद्यार्थ्याना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख यांचे स्थानांतरण झाल्याने त्याच्या जागी देवदास बोंबुर्डे तहसीलदार म्हणून मे महिन्याच्या शेवटी येथे रुजू झाले. तहसील कार्यालयात सर्वच कामे ऑनलाइन होत असल्याने डिजिटल स्वाक्षरीनेच प्रमाणपत्र दिले जाते. नव्याने मोहाडीत नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार देवदास बोंबुर्डे यांच्या डिजिटल स्वाक्षरीची डीएससी बनवण्यासाठी महासेवा केंद्र मुंबई येथे पाठविण्यात आले. 

अधिक वाचा - राजकारण : शिवसेनेत काँग्रेसी कल्चरचा शिरकाव; निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता, वाचा...

मात्र, मुंबईत कोरोना महामारीने काही कार्यालये नियमित चालू नाहीत. केवळ दहा टक्‍के कर्मचारी कामावर असल्याने तहसीलदारांची स्वाक्षरी डिजिटल स्वरूपात प्राप्त झाली नाही. एप्रिल महिन्यापासून मोहाडी तहसील कार्यालयात विविध प्रमाणपत्र करिता दोन हजारांवर प्रमाणत्र डिजिटल स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत पडून आहेत.या प्रमाणपत्रांवर तहसीलदारांची स्वाक्षरी महत्वाची आहे.

दोन हजारांवर प्रकरणे प्रलंबित

नुकतेच दहावी व बारावीचे निकाल घोषित झाल्याने पुढील शिक्षणासाठी प्रवेशअर्जासोबत जोडण्यात येणारे अधिवास प्रमाणपत्र, उन्नत वर्गात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या अर्जासोबत तहसीलदारांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 30 टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र व वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसीलदारांच्या स्वाक्षरीनेच ग्राह्य धरल्या जाते. तहसीलदाराची डिजिटल स्वाक्षरी महासेवा पोर्टलवर प्रमाणित न झाल्याने संबंधित दोन हजारांवर प्रकरणे तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत.

विद्यार्थी, नागरिकांना त्रास

मोहाडी तालुक्‍याचे वैनगंगा नदी पात्रामुळे दोन भागात विभाजन झाले आहे. पलीकडच्या भागातील नागरिक तुमसर मार्गे मोहाडीला येतात. दोन महिन्यांपासून प्रकरणे प्रलंबित असल्याने त्यांना प्रमाणपत्रावर स्वाक्षरी झाली काय हे माहित करण्यासाठी अनेकदा येऊन परत जावे लागते. यात पैसा व वेळेचा अपव्यय होत असल्याने नागरिक त्रासले आहेत. काही विद्यार्थ्याना समोरच्या शिक्षणापासून वंचित होण्याची स्थिती येऊ शकते.

नायब तहसीलदारांकडून अडवणूक

मोहाडी तहसील कार्यालयात दोन नायब तहसीलदार कार्यरत असले तरी, नायब तहसीलदार सोनकुसरे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. त्यांच्यामार्फत उत्पन्नाचे प्रमाणपत्र देता येऊ शकते. मात्र, त्यांच्या कडून नागरिकांची अडवणूक केली जात आहे. दुसरे नायब तहसीलदार नव्याने बदलून आले असून त्याची डिजिटल स्वाक्षरी प्रमाणित केली नाही. त्याच्याकडे अन्न पुरवठा विभागाचे काम दिले आहे.

हेही वाचा - सावधान! पुढील दोन दिवसांत या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

डिजिटल स्वाक्षरीसाठी महासेवा पोर्टलच्या कार्यालयात डीएससी बनविण्याकरिता दिलेली आहे. मात्र, ती अद्याप न मिळाल्याने स्वाक्षरीसाठी बरीच प्रकरणे प्रलंबित आहेत. एक दोन दिवसांत डिजिटल स्वाक्षरी झाल्यावर प्रकरणे निकाली काढण्यात येतील.
-देवदास बोंबुर्डे
तहसीलदार, मोहाडी. 

संपादन - अथर्व महांकाळ