उमेदवारांचा आक्षेपार्ह मजकूर हटवा : फेसबुकला निर्देश 

file photo
file photo

चंद्रपूर : उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रामध्ये समाज माध्यमांच्या खात्याविषयी माहिती दिलेली आहे. या खात्यांवर सायबर सेल तसेच माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची करडी नजर असून, काही उमेदवारांच्या समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर दिसून आला. यावर तत्काळ कारवाई करीत पोलिस विभागाच्या सायबर सेलने हा मजकूर हटवण्यासाठी फेसबुक कंपनीला निर्देशित केले आहे. 
फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटमधील एका उमेदवाराच्या फेसबुक खात्यावर परिवर्तनाची लाट या शीर्षकाखाली चित्रण प्रदर्शित करण्यात आले. या मजकुराला 19 इसमांना जोडण्यात आले होते. तसेच सदर मजकुराला 128 व्यक्तींनी लाईक केले आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडणार अशा पोस्टवर निवडणूक विभागाची करडी नजर असून, असे मजकूर सामाजिक माध्यमांवरून हटविण्याचे निर्देश कंपनीला दिले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com