दिल्लीच्या तोतयाने अमरावतीच्या डॉक्‍टरला गंडवले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

अमरावती : आरोग्यविषयक प्रकल्प मंत्रालयातून मंजूर करून आणतो, अशी बदनामी करून दिल्ली येथील बंटी-बबलीने अमरावतीच्या डॉक्‍टरची तब्बल पाच लाखांनी फसवणूक केली.
डॉ. विनोद बंडूजी फुसे (रा. राठीनगर) असे फसवणूक झालेल्या डॉक्‍टरचे नाव आहे.

हेमंत रॉबर्ट आणि एक महिला (रा. गुरुआनंदनगर, दिल्ली) असे लुबाडणूक करणारे आहेत. डॉ. फुसे संत बंडूजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक आहेत. संस्थेच्या वतीने आरोग्यविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन ते नेहमीच करतात. हेमंत रॉबर्ट व त्यांच्या संपर्कातील महिलेने डॉ. फुसे यांचा विश्‍वास संपादन करून त्यांना मंत्रालयातून आयुष प्रकल्प मंजूर करण्यासोबतच त्याचे देयकसुद्धा काढून देण्याचे आश्‍वासन दिले. त्यासाठी पाच लाख रुपये डॉक्‍टरकडून घेतले. 1 जानेवारी 2014 ते 2019 पर्यंतचा हा संपूर्ण घटनाक्रम आहे. हेमंत रॉबर्ट व त्याची महिला साथीदार बनावट असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यापूर्वीही शहरातील एका व्यापाऱ्याला अक्‍कबीरा हर्बल सिड्‌सचे आमिष दाखवून नायजेरियन टोळीने 66 लाखांनी लुबाडले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi`s fraud man revolts Amravati's doctor