esakal | बापरे! कर्जासाठी बॅंक व्यवस्थापकाकडून शरीरसुखाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

बापरे! कर्जासाठी बॅंक व्यवस्थापकाकडून शरीरसुखाची मागणी

बापरे! कर्जासाठी बॅंक व्यवस्थापकाकडून शरीरसुखाची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : कर्ज मिळवून देण्यासाठी दी. यवतमाळ को- ऑप. बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकाने (मॅनेजर) शरीरसुखाची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप महिला खातेदाराने केला आहे. या प्रकरणाची रितसर तक्रार गोंदिया शहर पोलिसांत केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कुठलीच कारवाई केली नसल्याचेही त्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. (Demand-for-physical-contact-made-by-the-bank-manager-for-the-loan)

महिला ही दी. यवतमाळ को- ऑफ बॅंकेची २०१७ पासून खातेदार आहे. त्यांचा तिरोडा रोड, कुडवा, गोंदिया परमात्मा एक इंटरप्रायजेस नावाने चहा पावडरचा व्यवसाय आहे. त्यांनी २०१७-१८ मध्ये व्यवसायासाठी १५ लाख रुपये कर्ज मिळावे, म्हणून बॅंकेकडे अर्ज केला होता. कर्जाच्या पेपरची फाइल पडताळून बॅंकेचे शाखा व्यवस्थापक (मॅनेजर) किशोर देशपांडे याने कर्ज देण्यास होकार दिला. कर्ज मिळण्यासाठी बॅंकेत सादर केलेले व्यापार व घराचे कागदपत्रे महिलेच्या नावावर असल्याने त्यांना कर्जाच्या कार्यवाहीसाठी वारंवार बॅंकेत जावे लागत होते.

हेही वाचा: १२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

प्रत्येकवेळी व्यवस्थापक किशोर देशपांडे हा दोन ते तीन महिन्यांत कर्ज मंजूर होईल, असे सांगत होता. कधीकाळी अश्लील भाषेचाही वापर करीत होता. कर्ज लवकर मंजूर करेन, पण शरीरसुखाची मागणी पूर्ण करावी लागेल, असेही तो म्हणाल्याचे महिलेने सांगितले. त्याच्या या मागणीस नकार दिल्याने कर्ज मंजूर करण्यास एक ते दीड वर्ष फिरविले.

कालांतराने सर्व कागदपत्रे बरोबर असताना कर्ज मिळण्यास उशीर होत असल्याने महिलेने मॅनेजर देशपांडे याला विनंती केली. त्यानंतर त्याने आठ लाख रुपये मंजूर केले. लाॅकडाउन आणि अन्य काही कारणामुळे व्यवसायाला फटका बसला. त्यामुळे पुन्हा पाच लाख रुपयांचे वाढीव कर्ज मिळावे, म्हणून त्या बॅंकेत गेल्या. वाढीव कर्जाबाबत समजताच मॅनेजर देशपांडे याने ‘मॅडम तुम्हाला एकदा सोडले, आता पुन्हा तुम्ही माझ्याच जाळ्यात सापडले, आता तुम्हाला सोडणार नाही’, असे म्हणत पुन्हा शरीरसुखाची मागणी केली.

या प्रकाराला कंटाळून त्यांनी मॅनेजरविरोधात गोंदिया शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला मोकळे सोडून दिले. पुढील कार्यवाही अद्याप झाली नाही. तपासी अधिकारी प्राजक्ता पवार आणि ठाणेदार यांची भूमिकाही संशयास्पद आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी महिलेने पत्रकार परिषदेतून केली आहे.

हेही वाचा: पेरणीसाठी गेलेली आई परतलीच नाही, शेवटी मृतदेह लागला हाती

पोलिस अधीक्षकांचेही कारवाईकडे दुर्लक्ष

गंभीर प्रकरणाची तक्रार तीन ते चार निवेदनांच्या माध्यमातून पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्याकडे केली आहे. परंतु, त्यांनीही तक्रारींकडे फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. इतक्या गंभीर प्रकरणात आरोपीला सहजासहजी सोडणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करीत महिलेने तपासी अधिकारी व ठाणेदारावरही कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

(Demand-for-physical-contact-made-by-the-bank-manager-for-the-loan)

loading image