गोरेवाडा नॅशनल पार्कला बाळासाहेब ठाकरेंचे नव्हे तर विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे नाव द्या!

सूरज पाटील
Saturday, 23 January 2021

गोरेवाडा नॅशनल पार्कची सुरुवात, मुहूर्तमेढ महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन वनमंत्री नानाभाऊ एंबडवार यांनी विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या सांगण्यानुसार केली होती. ॲडव्होकेट अजय चमीडिया यांनी वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद केला व वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय भाऊंचे कार्यकर्ते विदर्भाचे कार्यकर्ते स्वस्त बसणार नाही असे नमूद केले.

यवतमाळ : आज २३ जानेवारी... नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात येथे साजरी करण्यात आली. अनेक वर्षांपासून विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे हे नेताजी चौक येथे नेताजी जयंती साजरी करीत होते. त्याअनुषंगाने आजसुद्धा मोठ्या उत्साहात नेताजी सुभाष चंद्र बोस यांना अभिवादन करून व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सच्चे सिपाइ विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे व दिवंगत एडवोकेट हरीश मानधना यांना नेताजी चौक येथे अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात सर्वानुमते ॲडव्होकेट क्रांती राऊत धोटे यांनी विदर्भातील प्रकल्प, ब्रिज असो, युनिव्हर्सिटी कॉलेजेस असो, नॅशनल पार्क या सर्वांना विदर्भातील नेत्यांचेच नाव देण्यात यावे अशी मागणी केली. त्याच बरोबर नागपूर येथील गोरेवाडा नॅशनल पार्क नामांतर करण्याचा कट शिवसेनेने रचलेला आहे. त्याला तीव्र शब्दांमध्ये विरोध केला. विदर्भाच्या प्रकल्पाला, गोरेवाडा नॅशनल पार्कला विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे नाव देण्याचा ठराव याठिकाणी सर्वानुमते घेण्यात आला.

जाणून घ्या - ‘आत्महत्या’वार : विदर्भात तीन शेतकऱ्यांनी संपविले जीवन; सोबत दोघांनी घेतला गळफास

गोरेवाडा नॅशनल पार्कची सुरुवात, मुहूर्तमेढ महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन वनमंत्री नानाभाऊ एंबडवार यांनी विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या सांगण्यानुसार केली होती. ॲडव्होकेट अजय चमीडिया यांनी वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद केला व वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय भाऊंचे कार्यकर्ते विदर्भाचे कार्यकर्ते स्वस्त बसणार नाही असे नमूद केले. त्याचबरोबर श्रीरामजी खिरेकर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे सच्चे सिपाही विदर्भवीर भाऊ होते असे सांगितले.

श्री लालजी राऊत यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस आणि विदर्भवीर भाऊ यांच्यावर विश्लेषण केले व बलीदान पेपरचे संपादक भाऊ जांबुवंतराव धोटे होते या संदर्भातली माहिती दिली. कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी आमदार विजया धोटे, विदर्भासाठी पदयात्रा काढणारे ॲडव्होकेट अजय चमेडीया, विदर्भाच्या रथ यात्रेमध्ये सर्व नियोजन करणारे लालजी राऊत, क्रांती राऊत धोटे, मुकुंद दंदे, ट्रेड युनियनचे लीडर श्रीरामजी खिरेकर, बाबा पाटणे, सुभाष पावडे, मोतीराम सिंह, वहीद भाई, दिनेश पाचकवडे, खत्री जी, पठान जी, अनुप तेलानी व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for naming Gorewada National Park Jambuwantrao Dhote