नागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

नागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख
नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले. नागपूर महापालिकेच्या हद्दीत सर्वाधिक 46 डेंगीग्रस्त आढळल्यानंतरही महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्त आहे. डास निर्मूलनाची कोणतीही मोहीम हाती घेतलेली नाही.

नागपूर जिल्ह्यात डेंगीचा डंख
नागपूर : जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांमध्ये 15 दिवसांत 31 डेंगीग्रस्तांची भर पडली आहे. साडेसात महिन्यात 62 रुग्ण आढळले. नागपूर महापालिकेच्या हद्दीत सर्वाधिक 46 डेंगीग्रस्त आढळल्यानंतरही महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्त आहे. डास निर्मूलनाची कोणतीही मोहीम हाती घेतलेली नाही.
डेंगीवर स्पष्ट उपचार, कोणतेही ऍण्टीबायोटिक किंवा ऍण्टीव्हायरल औषधोपचार उपलब्ध नाही. डेंगी झाल्यास मृत्यूचा धोका आहे. मात्र, शहरात 7,316 घरांमध्ये डेंगीच्या अळ्या महापालिकेच्या सर्व्हेक्षणात आढळल्यानंतरही कारवाई करण्यात येत नाही तर प्रस्ताव तयार केला जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात पूर्व विदर्भात डेंगीच्या 71 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 31 रुग्ण हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. शहरातील 24 तर ग्रामीण भागातील 7 डेंगीचे रुग्ण आहेत. जानेवारी ते ऑगस्ट अशा आठ महिन्यात 128 डेंगीग्रस्तांची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्यामुळे डेंगीचे रुग्ण कमी झाले. मात्र, पावसाने दडी मारल्यांतर ऑगस्ट महिन्यात डेंगीचा प्रार्दूभाव वाढला आहे. डासांची उत्पत्ती वाढली असताना केवळ फवारणी हाच एक पर्याय म्हणून वापरला जात आहे.
मलेरियाचे चार रुग्ण
जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत पूर्व विदर्भात हिवतापाचे (मलेरिया) 1,801 रुग्ण आढळलेत. यात नागपूर शहरात केवळ चार रुग्ण आढळले. याबाबत आरोग्य विभागात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. डेंगी आणि मलेरियाच्या मृत्यूचे विश्‍लेषण करण्यासाठी विभागीय संशोधन समिती आहे. मात्र, समितीची मागच्या दोन महिन्यात बैठक झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: Dengue bite in Nagpur district