या जिल्ह्यात कोरोनासोबतच डेंगीचीही दहशत; आढळले रुग्ण

file photo
file photo

भंडारा : देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना जिल्ह्यात डेंगी आजाराने थैमान घातले आहे. मागील काही दिवसांत जिल्ह्यात डेंगीचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग व्यस्त असताना डेंगी आजाराचा प्रकोप दिसू लागल्याने आरोग्य विभागासमोर दुहेरी संकट ओढवले आहे. 

पावसाळ्यात दरवर्षी जिल्ह्यात डेंगी प्रादुर्भाव असतो. यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणा व्यस्त आहे. अशातच मुंबई, पुणे या मोठा शहरांमध्ये डेंगीचे रुग्ण आढळताच जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. कोरोनामध्ये सारी आजाराने थैमान घातला. मागील महिन्यात दोन रुग्णांचा सारी आजाराने मृत्यूही झाला. आता डेंगी आजाराने पाय पसरवल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
डेंगी ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होते. डेंगीचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या मादी डासामुळे होतो. या डासांच्या पायावर पांढरे पट्टे असल्याने त्यांना टायगर मस्कीटो म्हणतात. सदर डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.

त्यामध्ये रांजणातील पाणी, सिमेंटच्या टाक्‍यांतील पाणी, इमारतीवरील टाक्‍यांतील पाणी, घराभोवतालच्या टाकाऊ वस्तू (प्लॅस्टिकच्या बादल्या, रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, निरुपयोगी टायर्स)मध्ये साठलेले पाणी, घरातील कुंड्या, फुलदाण्या, कुलर्सआदी मध्ये साठवलेले पाणी यांच्यात होते. जिल्ह्यात धानपीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. यामुळे दरवर्षीच डेंगीचे रुग्ण आढळून येतात. ग्रामीण भागातही ही आजाराची लक्षणे असलेल्यांची तपासणी केली जात आहे. नागरिकांनी डेंगीसदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात जावून उपचार करावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी केले आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com