डेंगीची माहिती "मोबाईल'वर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नागपूर - डेंगी नोटीफाइड आजारात नोंद झाल्यानंतर शासकीय तसेच खासगीतून डेंगीग्रस्तांची नोंद आवश्‍यक आहे. नुकतेच  राष्ट्रीय डेंगीदिनाचे निमित्त साधून केंद्रीय आरोग्य विभागाने "इंडियन फाइट डेंगी' या नावाने मोबाईल ऍप सेवा सुरू केली. हा ऍप डाउनलोड करून एक बटन दाबताच डेंगीची अद्यावत माहिती मोबाईलच्या स्क्रीनवर उपलब्ध होईल. हा ऍप डेंगी जनजागरणासाठी वरदान ठरणार आहे, हे विशेष. 

या विषयी माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई म्हणाले, अँड्रॉइड मोबाईलवर "प्ले स्टोअर'मध्ये "इंडियन फाइट डेंगी' हे ऍप उपलब्ध आहे. नागरिकांनी हे ऍप डाउनलोड केल्यास त्यांना मोबाईलवर डेंगी आजारापासून बचावासाठीच्या सर्व टिप्स मिळतील. तसेच सर्व उपाययोजनांची माहितीदेखील उपलब्ध असणार आहे. 

नागरिकांना डेंगीपासून वाचवण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य केंद्र, तालुका आरोग्य केंद्र, ग्रामीण पातळीवर तसेच सार्वजनिक ठिकाण असलेल्या बसस्थानक, बाजारांसह गर्दीच्या ठिकाणी डेंगीची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना या संदर्भातील फलक लावण्यात आले आहेत. जनजागृतीपर पोस्टर, बॅनर लावले गेले आहेत, असे सांगत या ऍपचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी मोनिका चारमोडे (राघोर्ते) यांनी केले आहे. 

डेंगीच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात डासांची जी उत्पत्तीस्थाने आहेत ती नष्ट करणे, मच्छरदाणीचा वापर करणे, शोषखड्ड्यांची निर्मिती करणे, व्हेंटपाइपला जाळ्या बसविणे. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. सभोवतालचा परिसरही स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. 
-डॉ. योगेंद्र सवाई, जिल्हा आरोग्य अधिकारी, नागपूर. 

Web Title: Dengue Information on Mobile