अमरावती विभागात डेंगीच्या रुग्णसंख्येत घट, तीन वर्षांत फक्त पाच बळी

dengue
denguee sakal

अमरावती : अमरावती विभागातील (amravati devision) पाच जिल्ह्यांमध्ये डेंगीच्या रुग्णसंख्येत (dengue patients) लक्षणीय घट झाली आहे. डेंगी आजाराने अमरावती जिल्ह्यामध्ये २०१८ मध्ये चार, तर अकोला जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, गेल्या वर्षी एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. कमलेश भंडारी यांनी दिली. (dengue patients decreases in amravati division)

dengue
अखेर नागपूर महापालिकेला सुचलं शहाणपण! खाजगी रुग्णालय बिलासंदर्भात समिती स्थापन

डेंगी हा विषाणूपासून होणारा व डासांमार्फत पसरणारा कीटकजन्य आजार आहे. डेंगी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये पाणी साठवणुकीच्या भांड्यांना घट्ट झाकण बसवावे, पाण्याची भांडी दर आठवड्याला घासून पुसून स्वच्छ करावी व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. परिसरातील नाल्या वाहत्या कराव्यात, घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत, कायम डासोत्पत्ती स्थाने व डबक्यांमध्ये डासअळी भक्षक गप्पी मासे सोडावेत, निरुपयोगी साहित्य नष्ट करावे, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी, कुंड्यांमध्ये आवश्यक तेवढेच पाणी टाकावे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, अंगभर कपडे घालावेत, घरांच्या खिडक्यांना जाळी बसवावी, डास पळविणाऱ्या अगरबत्या, धूप, मलम इत्यादींचा वापर करावा आदी उपाययोजना करण्याचे आवाहन डॉ. भंडारी यांनी केले.

रक्तजल नमुना तपासणीसाठी सेंटिनल सेंटर

अकोला विभागामध्ये अकोल्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व यवतमाळ जिल्ह्यात श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे डेंगी व चिकुनगुनिया आजारांच्या रक्तजल नमुना तपासणीसाठी सेंटिनल सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याठिकाणी रक्तजल नमुना विनामूल्य तपासणी करण्यात येतो.

संशयित रुग्णांची माहिती कळवा -

अकोला विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सन २०१८ व सन २०१९ मध्ये डेंगी निश्चित रुग्ण संख्येमध्ये वाढ दिसून आली होती; परंतु सन २०२० पासून या रुग्णसंख्येमध्ये घट झाली आहे. कोणताही ताप आल्यास त्वरित रक्ताची तपासणी करून घ्यावी, उपाशीपोटी औषधोपचार घेऊ नये, असे डॉ. भंडारी म्हणाले. सर्व खासगी दवाखाने, खासगी प्रयोगशाळा व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या दवाखान्यात भरती असलेल्या संशयित डेंगी रुग्णांची माहिती संबंधित जिल्हा हिवताप अधिकारी यांना कळवावी, असे आवाहनही डॉ. भंडारी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com