"दंत'चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

file photo
file photo

नागपूर : मेडिकल असो की, शासकीय दंत महाविद्यालय. येथील विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास रस नाही. वर्गाला दांडी मारल्यामुळे विद्यार्थ्यांची हजेरी कमी असते. यामुळे यावर्षी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात बीडीएसच्या अंतिम वर्षाच्या काही विद्यार्थी, विद्यार्थिनींची हजेरी कमी असल्याने आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षेपासून त्यांना वंचित केले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, विद्यार्थिनींकडून आजारी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्यानंतरही ही कारवाई होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासन आमनेसामने आले आहे.
विदर्भात एकमेव शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपुरात आहे. बीडीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे. त्यात प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. त्यानंतर विद्यापीठाची लेखी परीक्षाही होईल. यावर्षी सुरू असलेल्या शैक्षणिक सत्रात काही विद्यार्थिनी आजारी असल्याने त्यांची हजेरी कमी होती. उपचारादरम्यानचे वैद्यकीय प्रमाणपत्र दंत प्रशासनाकडे सादर केले आहे. मात्र, विद्यापीठाच्या निकषानुसार हजेरी नाही, असे सांगत दंत महाविद्यालयातील दोन विषयांतील प्रात्यक्षिक परीक्षेला बसता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य विद्यापीठाचे अधिकारी तसेच दंतमधील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com