...अन् सातपुड्यात धावला पशुसंवर्धन विभाग; तीन दिवस ठिय्या, हे आहे कारण...वाचा

goat infected in buldana.jpg
goat infected in buldana.jpg

बुलडाणा : मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील चाळीस टापरी या आदिवासी पाड्यावर काही बकऱ्यांना न्युमोनिया सदृश आजार झाल्याचे लक्षणे आढळून आल्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली होती. यासंदर्भात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पशुसंवर्धन विभागाकडे याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. यावर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने 68 बकऱ्यांची तपासणी केली असून, त्यांचे स्वॅब नमुने, रक्तजल नमुने तपासणीसाठी घेतले आहे.

सर्वत्र कोरोना आजाराचा संसर्ग होत असून, याचे लक्षणे हे ताप, सर्दी आणि खोकला आहे. अशाच स्वरूपाचे काही लक्षणे हे चाळीस टापरी या भागातील बकऱ्यांमध्ये आढळून आल्यामुळे चिंता वाढली होती. दरम्यान, याबाबत विभागाने तत्काळ सदर पाड्याला भेट देऊन 68 बकऱ्यांची निरीक्षण केले. यापैकी एक बकरीचा मृत्यू झाला असून, काही मध्ये सर्दीची लक्षणे आढळून आली आहे. 

बकऱ्यांना सर्दीचा संसर्ग झाला असून, तो इतरत्र पसरू नये म्हणून बाधित बकऱ्यांना तीन दिवस वेगळ्या ठेवण्याचा सल्ला विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. सोबतच आहार, जंतू निर्मुलन आणि स्वच्छताविषयक काळजी घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. विभागाच्यावतीने बकऱ्यांचे निरीक्षण करण्यात येत असून, तीन दिवस पशुसंवर्धन विभागाचे एक पथक गावातच असून, उपचार व मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तत्काळ तपासणी व उपचार
सर्दीसह इतर लक्षणे आढळल्याचे कळताच प्रशासनाच्यावतीने एक पथक तपासणीसह उपचार करण्यासाठी पाड्यावर पाठविले. 20 व 21 एप्रिलला 68 बकऱ्यांवर उपचार करण्यात आले असून, त्यांच्यामध्ये सुधारणा होत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी.जी. बोरकर व सहाय्यक आयुक्त डॉ. जयस्वाल यांनी सांगितले आहे.

प्रशासनाकडूनही लक्ष
बकऱ्यांमध्ये संसर्गाचे लक्षणे दिल्यानंतर पशुसंवर्धन विभागाकडून तत्काळ एक पथक पाठविण्यात आले होते. प्राथमिक उपचार करून सध्या परिस्थिती उत्तम असून, सातत्याने काय होते यावर प्रशासनाकडूनही लक्ष ठेवण्यात येत आहे. घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही.
- हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार, बुलडाणा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com