Gadchiroli News : गडचिरोलीत देशातील सर्वोत्कृष्ट लोहखनिज

उपमुख्यमंत्री अजित पवार; जिल्ह्याचा औद्योगिक विकास वेगाने करण्याची ग्वाही
 गडचिरोली :कंपनीचे संचालक बी. प्रभाकरन यांच्याकडून कोनसरी प्रकल्पाची माहिती जाणून घेताना  उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री धर्मरावबाबा आत्राम.
गडचिरोली :कंपनीचे संचालक बी. प्रभाकरन यांच्याकडून कोनसरी प्रकल्पाची माहिती जाणून घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री धर्मरावबाबा आत्राम.sakal

गडचिरोली : वृक्षवल्ली आणि खनिज संपत्तीने समृद्ध गडचिरोली जिल्ह्यात आढळलेले लोहखनिज देशातील उत्कृष्ट लोहखनिज आहे.त्या लोहखनिजावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कोनसरीत उभा झाला असून येथील उत्पादने परदेशातही जातील. त्यातून देशाची आर्थिक गंगाजळी वाढेल. या अतिमागास म्हणवल्या जात असलेल्या जिल्ह्याचा औद्योगिक व सर्वांगीण विकास सरकार वेगाने करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लाॅयड मेटल्स कंपनीद्वारे नियोजित स्टिल निर्मिती प्रकल्पास उपमुख्यंत्री अजित पवार यांनी रविवार (ता. १७) भेट दिली. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्रामही उपस्थित होते. कंपनीचे संचालक बी. प्रभाकरन यांनी त्यांचे स्वागत करत या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रकल्पातील स्टिल निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली.

प्रकल्पाच्या उभारणीचे टप्पे, एकूण खर्च, राजगार निर्मिती आदींबाबत त्यांनी जाणून घेतले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यात देशातील सर्वोत्कृष्ट दर्जाचे खनिज आहे. त्यातून स्टिल निर्मितीसारखे प्रकल्प उभे राहत आहेत. ही जिल्ह्यातील औद्योगिक क्रांतीची नांदी आहे. नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात स्थानिकांना रोजगाराची फारशी साधने नाहीत.

मात्र या उद्योगातून आतापर्यंत हजारोंना रोजगार मिळाला आहे, यापुढेही हजारो बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात नियुक्ती म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा, असे अधिकारी समजायचे. पण आता ही ओळख नक्कीच पुसली जाणार आहे. जमशेदपूरमध्ये उद्योग निर्माण झाल्याने तेथे जशी समृद्धी आली तशीच समृद्धी या जिल्ह्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच रेल्वेमार्गामुळेही जिल्ह्यात सुविधा निर्माण होतील, असेही ते म्हणाले. याप्रसंगी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.

देशासाठी लाभदायक....

देशातील आकांक्षित जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी स्टिल निर्मिती प्रकल्पाने या जिल्ह्याचा चेहरामोहरा पालटून अतिवेगाने प्रगती होईल, शिवाय या प्रकल्पाचा देशाच्या आर्थिक विकासासाठीही लाभ होईल. येथील उच्च दर्जाचे उत्पादन देशातील विकासकामांत वापरता येईल. तसेच परदेशातही विक्रिस पाठविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे देशाला परकीय चलन मिळेल. म्हणून हा प्रकल्प जिल्ह्यासह देशविकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com