देशपांडे हत्याकांडातील आरोपींना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नागपूर ः नालंदा चौकातील आशीष देशपांडे हत्याकांडातील सहाही आरोपींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली. सर्व आरोपींना आज न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रकरणात फरार असलेल्या निखिल ऊर्फ हांड्या संजय मेश्राम (वय 28, रा. नालंदा चौक) याला शांतीनगर पोलिसांनी दिघोरी नाका भागात सापळा रचून अटक केली. आशीष हत्याकांडप्रकरणात अटकेतील मारेकऱ्यांची संख्या आता सहा झाली आहे. यापूर्वी पोलिसांनी आशीष मेश्राम, सूरज मेश्राम, रॉकी मेश्राम, आदर्श ढोके व आकाश धुर्वे या पाच जणांना अटक केली.

नागपूर ः नालंदा चौकातील आशीष देशपांडे हत्याकांडातील सहाही आरोपींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली. सर्व आरोपींना आज न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रकरणात फरार असलेल्या निखिल ऊर्फ हांड्या संजय मेश्राम (वय 28, रा. नालंदा चौक) याला शांतीनगर पोलिसांनी दिघोरी नाका भागात सापळा रचून अटक केली. आशीष हत्याकांडप्रकरणात अटकेतील मारेकऱ्यांची संख्या आता सहा झाली आहे. यापूर्वी पोलिसांनी आशीष मेश्राम, सूरज मेश्राम, रॉकी मेश्राम, आदर्श ढोके व आकाश धुर्वे या पाच जणांना अटक केली. पाचही जणांची गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
आशीषची हत्या केल्यानंतर हांड्या हा फरार झाला. तो भंडारा येथे आजीकडे गेला. बुधवारी हांड्या हा दिघोरी नाका भागात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शांतीनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. बी. उईके यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश घुगुसकर, वसीम देसाई व अश्विन बोरकर यांनी सापळा रचला. पोलिसांनी हांड्याला अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deshpande massacre Police custody for the accused