दूषित पाण्याचा विळखा; 400 नमुने दूषित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

जिल्ह्यातील 41 गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. संबंधित गावांमध्ये ब्लिचींग पावडर उपलब्ध नसल्याने अशुद्ध पाणी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित गावांमधील 400 पाणी नमूने दूषित आढळल्यामुळे साथराेगाचा धाेका वाढला आहे.

 अकाेला- जिल्ह्यातील 41 गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. संबंधित गावांमध्ये ब्लिचींग पावडर उपलब्ध नसल्याने अशुद्ध पाणी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित गावांमधील 400 पाणी नमूने दूषित आढळल्यामुळे साथराेगाचा धाेका वाढला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करता यावा यासाठी ब्लिचिंग पावडरची खरेदी ग्रामपंचायत स्तरावर होणे अपेक्षित आहे. परंतु जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती ब्लिचींग पावडर खरेदीत टाळाटाळ करता. त्यामुळे नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा ब्लिचींग पावडर विनाच करण्यात येताे. पावसाळ्याच्या दिवसात तर नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी ब्लिचींग पावडरचा उपयाेग करणे आवश्यक असते. परंतु जिल्ह्यातील 41 गावांमध्ये ब्लिचींग पावडर नसल्याने अशुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाळ्यातच संबंधित गावांमध्ये ब्लिचींग पावडरचा तुटवडा असल्यामुळे साथराेगाचा धोकासुद्धा वाढला आहे.

दीड हजारांवर नमुन्यांची तपासणी
जिल्ह्यातील 807 गावांमधील एक हजार 606 पाणी नमुन्यांची तपासणी आराेग्य विभागाने केली. त्यापैकी 41 गावांमधील 400 पाणी नमुने दूषित आढळले. अकाेला तालुक्यातील सर्वाधिक 26 गावांमध्ये पाणी नमुने दूषित आढळले.

साथ राेगाचा धाेका
दूषित पाणी पिल्यामुळे कॉलरासह इतर साथ राेग हाेण्याची शक्यता असते. ग्रामीण भागात शुद्ध पाण्याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे ते पावसाळ्यात शुद्ध पाणी पित नाहीत. दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथराेगाचा धोका सुद्धा वाढला आहे.

दूषित आढळलेले पाणी नमुने
तालुका दूषित नमुने

अकाेला 86
बार्शीटाकळी 46
अकाेट 61
तेल्हारा 15
बाळापूर 49
पातूर 34
मूर्तिजापूर 44
शहरी 61

Web Title: Detection of contaminated water; 400 samples contaminated