चोरट्यांचा एसटी बस चोरीचा प्रयत्न फसला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

स्थानिक बस स्थानकात मुक्कामी असलेले मानव विकास मिशनची बस अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना उघडकीस आली.

चोरट्यांचा एसटी बस चोरीचा प्रयत्न फसला

देऊळगाव राजा - स्थानिक बस स्थानकात मुक्कामी असलेले मानव विकास मिशनची बस अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना आज (ता. १४) उघडकीस आली. चोरट्यांनी पळविलेली बसचे युनिव्हर्सल जॉईंट तुटल्याने बस जागेवरच बंद पडली.

बस सोडून चोरट्यांना पळ काढावा लागला. त्यामुळे बस चोरीचा प्रयत्न फसला. शाळेतील मुलींना ग्रामीण भागातून आणण्यासाठी असलेली मानव विकास मिशनची बस रात्री उशिरा चोरट्यांनी बस स्थानकातून पळविली. चिखली मार्गाने पळविलेली ही बस शहरातील एचडीएफसी बँकेसमोर बंद पडली.अनेक वेळा मानव मिशनच्या बस तांत्रिक बिघाड आल्याने रस्त्यातच बंद पडतात आणि शाळकरी विद्यार्थिनींना त्रास सोसावा लागतो.

चोरट्यांनी एम एच ०७ सी ९२७३ क्रमांकाची बस पळविली. मात्र मानव विकास मिशनच्या बसने आपले खरे रूप दाखविले अन् रस्त्यात बंद पडल्याने चोरट्यांनी बस रस्त्यातच सोडून पळ काढला. बस चोरीच्या प्रकाराची माहिती देण्यासाठी स्थानिक बसस्थानक परिवहन मंडळाचे कर्मचारी दुपारनंतर पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र वरिष्ठांनी त्यांना तक्रार रोखले वृत्तलेपर्यंत सदर प्रकरणा विषयीची फिर्याद नोंदविण्यात आली नव्हती.