देवाजी तोफा म्हणाले, आदिवासींची परिस्थिती आणि आरोग्य सुधारले; दारुबंदी कायम ठेवा

मिलिंद उमरे
Saturday, 10 October 2020

गावा-गावातील महिला संघटित होऊन दारूमुक्त जिल्ह्याची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करीत आहेत. ग्रामसभा, व्यसनमुक्त समिती व महिलांनी संघटित होऊन दारूबंदीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात विषारी दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करीत त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करावे

गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यापासून आदिवासींची परिस्थिती आणि आरोग्य सुधारले आहे. दारू पिणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवावी, अशी सूचना ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांनी केली आहे.

पूर्वी आदिवासी समाजातील रितीरिवाज, परंपरे पुरतीच दारू गाळली जात होती. मात्र, आता दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्यामुळे आदिवासी समाजातील युवक, पुरुष दारूच्या आहारी गेले आहेत. दारूमुळे कित्येक आदिवासींचा मृत्यू झाला आहे. कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. दारूच्या नशेत बुडालेल्या आदिवासींचा बाहेरून आलेले कंत्राटदार, कंपन्या शोषण करीत आहेत. यासाठी जिल्ह्यात दारूबंदी आवश्यक असल्याचे मत देवाजी तोफा यांनी मांडले आहे.

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

गावा-गावातील महिला संघटित होऊन दारूमुक्त जिल्ह्याची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करीत आहेत. ग्रामसभा, व्यसनमुक्त समिती व महिलांनी संघटित होऊन दारूबंदीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात विषारी दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करीत त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करावे. जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवावी, असे मत ज्येष्ठ समाजसुधारक देवाजी तोफा यांनी मांडले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devaji Tofa demands to maintain the liquor ban