मोर्णा नदीसाठी राज्य सरकारने दिले चार कोटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

‘मनपातील रिक्त पदे भरा’
महापालिकेतील अधिकाऱ्यांनी अनेक पंद रिक्त आहेत. उपायुक्त, मुख्य लेखापाल आदी पदांचा त्यात समावेश आहे. रिक्त पदांमुळे कामकाजावर होणारा परिणाम लक्षात घेता ही पदे तातडीने भरण्यात यावी, अशी विनंती महापाैर विजय अग्रवाल यांनी वित्तमंत्र्यांकडे केली. मनपा क्षेत्रातील विविध विकास कामांचे प्रस्तावही महापाैरांनी वित्तमंत्र्यांनी दिले.

अकोला : मोर्णा नदी विकासासाठी संपूर्ण प्रकल्प अहवाल (डीपीआर) जिल्हा प्रशासनातर्फे मंगळवारी राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. पहिल्या पट्ट्यात नदीमध्ये बांध बांधून पाणी अडविण्यासाठी ३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यावर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने निर्णय घेत चार कोटी रुपये मंजूर केले.

अकोला शहरासाठी व जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी विकास निधी संदर्भात राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्त मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांची भेट जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी घेतली. यावेळी त्यांनी एक प्रस्तावही सादर करण्यात आला. हा प्रस्ताव सादर करताना खासदार संजय धोत्रे, आमदा गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी लोकप्रतिनिधींनी बैठक घेतली. त्यातून समस्या, अडचणी तसेच विकास कामचे प्रस्ताव तयार करण्यात आले. या प्रस्तावानुसार जिल्ह्यासाठी लागणारा विकास निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे निवेदन खासदार, आमदारांनी मंगळवारी वित्तमंत्र्यांनी दिले. त्यानंतर वित्त मंत्र्यांनी तातडीने चार कोटी रुपये मोर्णा नदी प्रकल्पासाठी मंजूर केले.

‘मनपातील रिक्त पदे भरा’
महापालिकेतील अधिकाऱ्यांनी अनेक पंद रिक्त आहेत. उपायुक्त, मुख्य लेखापाल आदी पदांचा त्यात समावेश आहे. रिक्त पदांमुळे कामकाजावर होणारा परिणाम लक्षात घेता ही पदे तातडीने भरण्यात यावी, अशी विनंती महापाैर विजय अग्रवाल यांनी वित्तमंत्र्यांकडे केली. मनपा क्षेत्रातील विविध विकास कामांचे प्रस्तावही महापाैरांनी वित्तमंत्र्यांनी दिले.

Web Title: development fund for Morna River in Akola