मुख्यमंत्री फडणवीसांना नागभूषण पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नागभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नागभूषण फाउंडेशनच्या वतीने १ जानेवारीला (रविवार) दुपारी ४.३० वाजता साई सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २०१६ सालचा हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात येईल. 

या वेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर अध्यक्षस्थानी असतील. तर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर प्रमुख पाहुणे राहतील. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती आणि माजी खासदार दत्ता मेघे यांची विशेष उपस्थिती असेल. नागभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले, उपाध्यक्ष सत्यनारायण नुवाल, सचिव गिरीश गांधी आणि कोषाध्यक्ष ब्रजकिशोर अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत आयोजनासंदर्भात माहिती दिली. यापूर्वी रा. कृ. पाटील, नितीन गडकरी, भन्ते सुरई ससाई, जी. एम. टावरी, प्राचार्य राम शेवाळकर, डॉ. प्रकाश व मंदा आमटे, मारुती चितमपल्ली, प्रा. महेश एलकुंचवार, कवी ग्रेस, राजकुमार हिराणी, ठाकूरदास बंग, ॲड. व्ही. आर. मनोहर, डॉ. विजय भटकर, डॉ. विकास आमटे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Web Title: devendra fadnavis gives to nagbhushan award