धामणगाव-मुरपार रस्ता खातोय धुळ

नांद ः धामणगाव-मुरपार-खंडसंगी रस्ता तयार न झाल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय.
नांद ः धामणगाव-मुरपार-खंडसंगी रस्ता तयार न झाल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय.

नांद  (जि.नागपूर): नागपूर-चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा धामणगाव-मुरपार-खंडसंगी रस्ता अजूनही धूळखातच पडलेला आहे. या मार्गाकरिता परिसरातील नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही धामणगाव-मुरपार-खडसंगी मार्गाकरिता लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवली. 
नागपूर-चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणारा व कमी अंतराचा सोयीस्कर असणारा मार्ग असून या मार्गाला लागूनच चिमूर तालुक्‍यातील मुरपार येथे कोलमाइन्स आहे. ही कोलमाइन्स उमरेड डब्ल्युसीएल अंतर्गत येते. या कोलमाइन्सला उमरेड-नांद व्हाया जाण्याकरिता कामगारांना अति जवळचा मार्ग आहे. उमरेड व चिमूर विधानसभा क्षेत्राचे दोन्ही आमदार सुधीर पारवे व बंटी भांगडिया हे भाजपचे आमदार आहेत. त्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. धामणगाव-मुरपार-खंडसंगी हा मार्ग कितीतरी वर्षांपासून तयारच करण्यात आला नाही. हा मार्ग वनविभागांतर्गत येतो. या भागात घनदाट जंगल आहे. हा मार्ग वनविभागाच्या अडचणींमुळे होऊ शकला नाही, हे त्यामागील खरे कारण आहे. मुरपार ते खडसंगी हा मार्ग डब्ल्युसीएल माईन्सने स्वतःकडून करून घेतला. पण, मुरपार धामणगाव-नांद हा मार्ग वनविभागामुळे अडकलेला आहे. चिमूर ही परिसरातील मोठी बाजारपेठ असल्याने धामणगाव, लोणारा, वणी, आलेसुर, खोलदोडा, नांद, मुरपार, मिंझरी, झमकोली येथील गावातील नागरिक बाजार वा इतर व्यापार करण्याकरिता जात असतात. तसेच दळणवळणाच्या द्रुष्टीने हा महत्त्वाचा मार्ग आहे. अडचणींचा मार्ग म्हणजे नागपूर-चंद्रपूर व उमरेड-भिवापूर तालुका व चिमूर तालुक्‍याने सीमेपर्यंत केला. पण, दोन्ही तालुक्‍याच्या मध्यभागातील वनविभागाच्या अंतर्गत असणाऱ्या भागात मार्गाचे काम होऊ शकले नाही. पावसाळ्यात लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. या मार्गाने पायदळी जाणे कठीण होऊन जाते. त्यामुळे कोलमाईन्सचे कामगार व इतर नागरिक चिमूर बाजारपेठेला जाण्याकरिता रस्ता नसल्यामुळे भिसीमार्गे फेरा देऊन जातात. हा मार्ग पूर्ण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागते. एकाच पक्षाचे भाजपचे दोन्ही आमदार असूनही धामणगाव-मुरपार-खडसंगी हा मार्ग होऊ न शकल्याने परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com