बाबासाहेबांनी तयार केले मानवतेचे मंदिर

केवल जीवनतारे
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागभूमीत पाच लाखांवर अस्पृश्‍यांना बौद्धधम्माची दीक्षा देऊन माणूस म्हणून जगण्याचा हक्क बहाल केला.

बाबासाहेबांच्या या रक्तविहीन धम्मक्रांतीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भरभरून कौतुक केले. बाबासाहेब सच्चे धर्मपुरुष असून ‘बुद्धं शरणं गच्छामि’च्या जयघोषातून त्यांनी दूरदृष्टीचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचे स्वागत करीत मानवतेचे मंदिर त्यांनी केल्याची नोंद ‘धर्ममद धर्मक्रांती’च्या अग्रलेखात नोंदवून ठेवली आहे. 

जपान येथील टोकियो शहरात विश्‍वशांती परिषदेचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रतिनिधित्व केले. तथागत बुद्धांच्या पंचशीलाने विश्‍वात शांतता प्रस्थापित होऊ शकते, असे बुद्धांच्या मानवतावादाचे दर्शन या परिषदेला राष्ट्रसंतांनी करून दिले. त्यानंतर नागपुरात येताच १८ सप्टेंबर १९५५ रोजी सीताबर्डीतील धनवटे चेंबर्स येथे तत्कालीन राजस्वमंत्री भगवंतराव मंडलोई यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सत्कार झाला. 
या वेळी जपान, बॅंकॉक, रंगून इत्यादी बौद्ध राष्ट्रांमध्ये बौद्धधम्मातून माणुसकी कशी जपली जाते, यावर भाष्य केले. हाच मानवतावाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षा सोहळ्यातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना दिसला. राष्ट्रसंतांनी चक्क बाबासाहेबांच्या 

धम्मदीक्षेच्या क्रांतीवर अग्रलेख लिहिला. राष्ट्रसंत अग्रलेखात लिहितात, उच्चवर्णीयांनी उच्चशिक्षित ज्ञानिवंत बाबासाहेबांना समजून घेतले नाही. मानवी अधिकारापासून त्यांना वंचित ठेवले. यामुळे त्यांनी रूढी-परंपरेच्या साखळदंडावर घणाघाती प्रहार केला. एवढेच नव्हे, तर या देशातील अस्पृश्‍य समाजाला विकासाचा मार्ग दाखविला. सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. वैचारिकतेतून केलेली ही उच्च कोटीची क्रांती आहे. लाखमोलाचे उच्च दर्जाचे मानवतेचे मंदिर जणू बाबासाहेबांनी तयार केले. मोठे धर्मकार्य असून ही एक प्रकारची किमयाच आहे. विजयादशमीच्या पर्वावर नागपुरात जाहीररीत्या बौद्धधम्मातील प्रवेश ही असामान्य घटना आहे. बाबासाहेब एक महापुरुष आहेत, असेही त्यांनी नोंदविले.

भजनातूनही बाबासाहेबांचे कौतुक 
बाबासाहेबांवर केलेल्या भजनातही ते म्हणतात- प्रबुद्ध करणे जनता सारी, बुद्ध जो तुमने चुन्हा है... धन्य किया जीवन सबका... सुविचारोंने माना है... राष्ट्रसंतांचा बाबासाहेबांच्या दीक्षा सोहळ्यानंतरच्या आठवणींना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भक्त ज्ञानेश्‍वर दुर्गादास रक्षक यांनी असा उजाळा दिला.

Web Title: dharmad dharmkranti editorials

टॅग्स