

Dharmendra’s Passing Evokes Memories of His 2007 Khāmgaon Visit
Sakal
खामगाव : कित्येक दशके सिनेरसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांनी आज ता.२४ नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान सन २००७ साली एका कार्यक्रमासाठी ते खामगाव येथे होते. त्यावेळी त्यांनी युवकांना व्यसनाधिनतेच्या आहारी न जाता शरीरयष्टी जपा असा मोलाचा सल्ला दिला होता. त्यांच्या देहावसनामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला असून खामगावकरांच्या निरंतर ते आठवणीत राहणार आहेत.