ग्रामसेवक संघटनेचे धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

लाखनी (जि. भंडारा) : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेतर्फे शुक्रवारी (ता.9) क्रांतिदिनी ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

लाखनी (जि. भंडारा) : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेतर्फे शुक्रवारी (ता.9) क्रांतिदिनी ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे पद रद्द करण्यात यावे. त्याऐवजी पंचायत विकास अधिकारी या पदाची निर्मिती करावी. ग्रामसेवक संवर्गास शासन नियमाप्रमाणे प्रवासभत्ता मंजूर करावा. ग्रामसेवक पदासाठी पदवीधर ही अर्हता करावी. लोकसंख्येवर आधारित साझे व पदांमध्ये वाढ करावी. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यातील वेतनत्रुटी दूर करावी. 2005 नंतरच्या नियुक्त ग्रामसेवकांनी जुनी पेन्शन लागू करावी. आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळविणाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ द्यावी. ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करावी, इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. लाखनी : पंचायत समितीसमोर धरणे आंदोलनात सहभागी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dharna Movement of the Gramsevak Sangh