हिऱ्यांची तस्करी, 20 लाखांचा माल जप्‍त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी मुंबई-नागपूर दुरांतो एक्‍स्प्रेसमध्ये कारवाई करीत रेल्वेतून हिरे, सोन्याच्या दागिन्यांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आणले. कारवाईत १९ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण आयकर विभागाकडे वर्ग करण्यात आले.

१२२८९ मुंबई - दुरांतोमधून सोने, हिऱ्यांचे दागिने असलेली खेप येणार असल्याची माहिती आरपीएफच्या गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. सकाळी साडेसात वाजता ही गाडी फलाटावर येऊन थांबताच जवान हालचालीवर लक्ष ठेवून होते. मागच्या भागातील पार्सल डब्यातून साहित्य उतरवीत असताना एक मोठ्या पॅकेटवर शंका आली. ते पार्सल क्विक कुरिअर लॉजेस्टिक सर्व्हिसेसचे असल्याने कंपनीच्या प्रतिनिधीला बोलावण्यात आले. पार्सल उघडले असता त्यात हिरेजडित सोने व चांदीचे तसेच काही आर्टीफिशीयल दागिने आढळले. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांच्या मार्गदर्शनात तातडीने घटनेची माहिती आयकर विभागाला देण्यात आली. मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आला. 

प्रकार नित्याचाच?
पार्सलमधून पाठविलेल्या साहित्याची माहिती लपविण्यात आली. रेल्वेतून वाहतुकीवर प्रतिबंध असलेल्या वस्तूंमध्ये सोन्याचाही समावेश असल्याने कारवाई करण्यात आली. टॅक्‍स (जीएसटी) वाचविण्यासाठी छुप्या पद्धतीने दागिन्यांची वाहतूक केली जाते. पार्सलमध्ये सोन्याचे दागिने असल्याची शंका कंपनीच्या प्रतिनिधीने व्यक्त केली. पण, त्याच्याकडे पावत्या नव्हत्या. यावरून यापूर्वी नियमित अशाप्रकारे दागिने आणले जात असावे, अशी शंका आहे.

Web Title: diamond smuggling crime