आई दुसऱ्या कामात, तिकडं कपडे वाळवण्याचा चिमटा नाकाला लावल्याने चिमुकलीचा मृत्यू

Mumbai Crime News
Mumbai Crime News esakal

अकोला : खदान पोलिस स्टेशन हद्दीतल हिंगणा फाटा बलोदे ले आऊट परिसरात असणाऱ्या रविंद्र आमले यांच्या साडेपाच वर्षीय चिमुकलीने कपड्याला लावण्यात येणारा चिमटा नाकाला लावल्यामुळे श्वास घेता न आल्याने चिमुकलीचा गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Mumbai Crime News
Fort : केरळच्या अवलियाला लागले महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे ‘वेड’; १३ महिन्यांपासून भटकंतीवर

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी अडल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बाबत प्राप्त माहितीनुसार चिमुकलीची आई घरकाम करत असताना तिचे मुलीकडे दुर्लक्ष झाले असावे. या दरम्यान मुलीने कपड्यांना लावण्यात येणारा चिमटा नाकाला लावला.

ज्यामुळे श्‍वासोश्वात घेता न आल्याने ती घरात पडलेली होती. यावेळी मुलीच्या आईने सदर मुलीला हॉस्पीटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी चिमुकलीला मृत घोषित केले. गुदमरून या चिमुकलीचा करूण अंत झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणी खदान पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com