डिझेलची अवैध विक्री करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

वरुड (जि. अमरावती) : बेकायदेशीररीत्या डिझेलची विक्री करताना बेनोड्यात एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही घटना आज, रविवारी घडली.

वरुड (जि. अमरावती) : बेकायदेशीररीत्या डिझेलची विक्री करताना बेनोड्यात एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही घटना आज, रविवारी घडली.
बेनोडा शहीद पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाकर वाघमारे, साहेबराव राजस, संतोष औंधकर, राजेश टेकाम, गजानन कडू, सचिन भोसले, संजय ठाकरे, सुधीर वीरखडे यांनी बेनोडा येथील रामकृष्ण कॉलनी परिसरात छापा टाकला. तेव्हा सुनील गोरले याने एमएच 34 के 974 क्रमांकाच्या वाहनात 225 लिटर डिझेल विनापरवाना विक्रीकरिता साठवून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडून 1 ड्रम व 3 प्लॅस्टिक डबकीमध्ये भरलेले 15 हजार 400 रुपये किमतीचे 225 लिटर डिझेल व गाडी, असा एकूण 1 लाख 35 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व संशयित आरोपीला अटक करण्यात आली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diesel illegal salesman arrested

टॅग्स