डिजिधन योजनेतील विजेत्यांना पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

नागपूर - देशात डिजिटल व्यवहार ही जनचळवळ व्हावी यासाठी नीती आयोगाने सुरू केलेल्या लकी ग्राहक योजनेअंतर्गत राज्यातील लातूरच्या श्रद्धा मेंगशेट्टेने एक कोटीचा पहिला पुरस्कार पटकावला. 

ठाणे येथे ब्यूटीपार्लर चालवणाऱ्या रागिणी राजेंद्र उतेकर यांनी डिजिधन व्यापार योजनेअंतर्गत दुसरा २५ लाखांचा पुरस्कार पटकावला. या गटात ५० लाखांचा पहिला पुरस्कार पटकावणाऱ्या चेन्नईमधील तंबारम येथील आनंद अनंत पद्मनाथन्‌ यांनी ही रक्कम गंगा स्वच्छता अभियानाला दिली. 

नीती आयोगातर्फे मानकापूर येथील क्रीडासंकुलात आज डिजिधन योजनेच्या शंभराव्या मेळाव्यात लकी ग्राहक व व्यापाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आले. या योजनेअंतर्गत ग्राहक आणि व्यापाऱ्यांसह १६ लाख विजेत्यांना २५८ कोटी रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या महासोडतीतल्या विजेत्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील इलेक्‍ट्रिकल अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाची २० वर्षीय विद्यार्थिनी श्रद्धा मेंगशेट्टे ग्राहकांसाठीच्या एक कोटी रुपयांच्या महासोडतीची विजेती ठरली.

नव्या मोबाईलसाठी मासिक १५९० रुपयांचा हप्ता रूपे कार्डद्वारे ऑनलाइन भरून केलेल्या व्यवहारामुळे ती विजेती ठरली. या गटात ५० लाखांचे द्वितीय पारितोषिक गुजरातमधील हार्दिक कुमारने पटकावले. प्राथमिक शिक्षक असलेल्या या २९ वर्षीय शिक्षकाने ११०० रुपयांचा व्यवहार रूपे कार्डद्वारे केला होता. उत्तराखंडमधील शेरपूर या गावातील भरतसिंह यांनी फक्त १०० रुपयांचा व्यवहार रूपे कार्डद्वारे केला आणि ते २५ लाख रुपयांच्या पारितोषिकाचे विजेते ठरले. व्यापाऱ्यांसाठी असलेल्या डिजिधन व्यापार योजनेअंतर्गत ५० लाख रुपयांचे पहिले पारितोषिक चेन्नईमधील तंबारम येथील आनंद अनंत पद्मनाथन्‌ यांना मिळाले.

अनंत पद्मनाभन्‌ यांनी पुरस्काराची रक्कम तत्काळ गंगा स्वच्छता मोहिमेसाठी दिली. २५ लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार राज्यातील ठाणे येथे छोटे ब्यूटीपार्लर चालविणाऱ्या रागिणी राजेंद्र उतेकर यांना मिळाला. ५१० रुपयांचे पेमेंट स्वीकारल्याने त्या पारितोषिकासाठी पात्र ठरल्या.

तेलंगणातील अमीरपेट येथील घाऊक कपडा चालवणारे ३३ वर्षांचे शईक रफी यांना १२ लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार मिळाला.

Web Title: digidhan scheme winner award