Yavatmal Cyber Fraud : डिजिटल अरेस्ट’च्या नावावर ६१ वर्षीय शेतकऱ्याची तब्बल ९६ लाखांची फसवणूक; नक्षलवाद्यांना पैसा पाठवला म्हणून वृद्धाला धमकी!

Digital Arrest Scam : यवतमाळमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने ६१ वर्षीय शेतकऱ्याची तब्बल ९६ लाखांची फसवणूक झाली. खोटा पोलीस अधिकारी बनून नक्षलवाद्यांना पैसे पाठविल्याची भीती दाखवत रक्कम उकळली.
Yavatmal senior citizen cheated of ₹96 lakh through fake ‘digital arrest’ scam

Yavatmal senior citizen cheated of ₹96 lakh through fake ‘digital arrest’ scam

Sakal

Updated on

यवतमाळ : 'तुमच्या नावाने २५० कोटींचे बेकायदा व्यवहार झाले आहेत, नक्षलवाद्यांना पैसा पाठवला आहे, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे, आता तुम्हाला लगेच अटक होईल' अशी बतावणी करून एका वृद्धाची तब्बल ९६ लाख ६० हजार ७३० रुपयांनी फसवणूक करण्यात आली. 'डिजिटल अरेस्ट'च्या नावे फसवणूकीची ही घटना ३० नोव्हेंबर रोजी येथील सारस्वत चौक येथे उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गिरीष श्रीधर कळसपुरकर ( ६१) रा. सारस्वत चौक, अवधूतवाडी, यवतमाळ असे फसवणूक झालेले वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. कळसपुरकर यांच्याकडे सुमारे ४४ एकर शेती आहे. .

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com