esakal | 'त्या' रात्री १० नाही ११ जीव गेलेत; भंडारा आग प्रकरणात मोठा ट्विस्ट; खळबळजनक आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Dinesh Rohankar Blames hospital about his wifes death in Bhandara

आता या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. दिनेश रोहनकर नावाच्या व्यक्तीनं एक खळबळजनक आरोप केला आहे. 

'त्या' रात्री १० नाही ११ जीव गेलेत; भंडारा आग प्रकरणात मोठा ट्विस्ट; खळबळजनक आरोप

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

भंडारा: काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनं महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला. ती घटना म्हणजे भंडारामधील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास लागलेली आग. या आगीत तब्बल १० नवजात शिशुंचे प्राण गेले. मात्र आता या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. दिनेश रोहनकर नावाच्या व्यक्तीनं एक खळबळजनक आरोप केला आहे. 

शनिवारी रात्री आग लागल्यावर १० नाही ११ जीव गेले. असा आरोप पेंढरी येथील दिनेश रोहणकर यांनी केला आहे. नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला आग लागल्यानंतर इतर रुग्णांच्या अतिदक्षता कक्षात भरती असलेल्या लाखांदुर तालुक्यातील पेंढरी (सोनेगाव) येथील अल्का दिनेश रोहनकर (३९) या विवाहितेला आवश्यकता  नसतांनाही नागपुरला हलविण्यात आले होते. 

नक्की वाचा - नवनीत राणांनी घेतला उखाणा अन् उपस्थितांच्या तोंडी एकच वाक्य 'वाह वाह क्या बात है!'

त्याचा वाटेतच ऑक्सिजन अभावी मृत्यु झाला. सदर महिलेला निमोनीया झाला असल्याने कोरोना संशयीत म्हणुन आयसोलेशन वार्डात १४ डिसेंबर रोजी भरती करण्यात आले होते. दोनदा त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयाच्या नेहमीच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. 

९ जानेवारीच्या रात्री नवजात शिशुच्या अतिदक्षता कक्षाला आग लागल्यानंतर इतर रुग्णांच्या अतिदक्षता कक्षातील दोन रुग्णांना तातडीने नागपुर मेडीकलला रेफर करण्यात आले होते. यातील अल्का रोहनकर या रुग्णाचा ऑक्सिजन अभावी रस्त्यातच मृत्यु झाला. रुग्णालयात ऑक्सिजनचा मुबलक साठा असतांना आणि रुग्णालयात दुसरीकडे रुग्ण ठेवण्याची व्यवस्था असतांनाही सदर रुग्णाला नागपुरला का? हलविण्यात आले. असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

अधिक माहितीसाठी - मन सुन्न करणारं वास्तव! जीवाचं रान करून वाढवलेल्या जीवांना खड्ड्यात पुरण्याची आली वेळ

नवजात शिशुंच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीचा परिणाम दुसर्‍या कक्षातील रुग्णांवर झाला कि, नाही ? याची साधी चौकशी करण्याची आवश्यकता मंत्री महोदयांना व नेतेमंडळींना वाटली नाही का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सदर महिलेचा मृत्यु ऑक्सिजन अभावी झाला असला तरी हा मृत्यु रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा महिलेचे पती दिनेश रोहनकर व कुटुंबियांनी केला आहे. सदर महिलेल्याच्या मृत्युबाबतची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सुद्धा देण्यात आली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image