खंडेलवाल शाळेची लीज नामंजूर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

नागपूर  : रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण यांनी कामठी येथील 11 एकर जागा विद्यापीठाला शैक्षणिक उपक्रमाकरिता दान दिली होती. ती जागा नागपूर विद्यापीठाने खंडेलवाल या व्यक्तीला शाळा चालविण्याकरिता दिली. मात्र, त्या जागेचा खंडेलवाल शाळेकडून गैरवापर करण्यात आला. शिवाय या जमिनीची लीज 11 जुलै 2018 ला संपल्याने जागा खाली करण्यासंदर्भात कायदेशीर नोटीस द्यावी, असा ठराव व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानुसार विद्यापीठाने त्यांना नोटीस बजावली. विद्यापीठ या जागेवर ताबा घेणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत खंडेलवाल यांना लीज वाढवून देण्यासंदर्भातील ठराव होता. विद्यापीठाने कामठी येथील डी. लक्ष्मीनारायण बंगला आणि 11.8 एकर जमीन खंडेलवाल ट्रस्टला शाळा चालविण्याकरिता 41 वर्षांपूर्वी भाडेपट्टीवर दिली होती. या जागेची लीज वाढवून देत असताना ट्रस्टला तिथे कोणतेही अवैध बांधकाम करण्यात येऊ नये, असे कळविण्यात आले होते. परंतु, त्यानंतरही ट्रस्टने तिथे शाळेचे अवैध बांधकाम केले. त्याची कोणतीही परवानगी विद्यापीठाकडून घेतली नाही. दरम्यान, ट्रस्टला अखेरची पाच वर्षांची लीज वाढवून देण्याचा निर्णय घेत पाच वर्षांनंतर सदर जमीन रिकामी करण्याची हमी ट्रस्टने द्यावी, अशी अट घालण्यात आली होती. परंतु, विद्यापीठाची अट मान्य करण्यास ट्रस्टने नकार दिला होता. तेव्हा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने खंडेलवाल ट्रस्टसोबत केलेला करार तातडीने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या शाळेतील विद्यार्थ्यांचा विचार करून खंडेलवाल यांना लीज वाढवून दिली होती. जुलै 2018 मध्ये लीज संपली. मात्र, या पाच वषीांत खंडेलवाल यांनी आपली पर्यायी व्यवस्था न शोधल्याने खंडेलवाल ट्रस्ट विद्यापीठाची जमीन हडपण्याचा डाव रचला असल्याचा दावा व्यवस्थापन सदस्यांनी यावेळी केला होता. त्यामुळे विद्यापीठाने "लीज' नामंजूर करीत जागा खाली करण्यासंदर्भात नोटीस पाठविली. यासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे हित लक्षात घेता जोपर्यंत जागा खाली होत नाही तोवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार भाडे आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Web Title: Disclaimer of Khandelwal school lease