अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

बल्लारपूर (चंद्रपूर) : शाळा सुटल्यानंतर बसमधून परतीच्या वेळी चार वर्षीय चिमुकलीसोबत चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अश्‍लील कृत्य केले. या घटनेची माहिती होताच पीडितेच्या वडीलाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पाक्‍सोअंतर्गत गुन्हा दाखल करीत चालकासह चौघांना अटक केली आहे.

पीडित मुलगी हनी क्रिएटिव्ह माईंड शाळेत शिक्षण घेत आहे. बुधवारी दुपारी 1 वाजता शाळा सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे शाळेतील मिनी स्कूल बसमध्ये बसून घराकडे परत येत होती. काही अंतरावर गेल्यानंतर वाहनचालक आणि त्याच्या तीन साथीदारांनी तिच्याशी अश्‍लील चाळे करणे सुरू केले. स्कूलबसच्या मागे असलेल्या एका व्यक्तीच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्याने घटनेची माहिती मुलीच्या वडिलांना दिली. त्यानंतर वडीलाने वाहनचालकाला यासंदर्भात विचारणा केली. यावेळी चालकाचे हावभाव बघून पालकाला संशय आला. त्यानंतर पालकाने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
या तक्रारीवरून पोलिसांनी वाहनचालक विक्की राजू चिंतावार (वय 29), सूरज राजू ठाकूर (वय 21), सूरज श्रीचंद राजभर (वय 29), अनुप फुलचंद तिवारी (वय 27) या चौघांविरुद्ध पाक्‍सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. गुरुवारी चारही व्यक्तींना न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बोंदके करीत आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disgrace of a minor girl