मलकापूर बाजार समितीमधील प्रशासकीय मंडळ बरखास्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्र्यांनी याबाबत पत्र काढीत कार्यरत प्रशासकीय मंडळ बरखास्त करून नवीन प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांना पाठविले होते.

मलकापूर : महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व नियमन) अधिनियम 1963 चे कलम 13 (2) व 14 (3) अन्वये असलेल्या अधिकारान्वये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणाचे डॉ.महेंद्र चव्हाण यांनी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 20 सदस्यीय कार्यरत अशासकीय प्रशासकीय मंडळ बरखास्त करीत बाजार समितीचे कामकाज पाण्यासाठी नवीन 16 सदस्यीय अशासकीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्याचे आदेश 4 जानेवारी रोजी निर्गमीत केले.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कार्यरत असलेले अशासकीय प्रशासकीय मंडळ बरखास्त करण्याच्या हालचालींना गेल्या काही दिवसांपासून आ.राजेश एकडे यांच्या माध्यमातून वेग आला होता. त्यानुसार 2 जानेवारी रोजी सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्र्यांनी याबाबत पत्र क्र.कृबास-0120/प्रक्र.01/21-स 2 जानेवारी 2020 रोजी काढीत कार्यरत प्रशासकीय मंडळ बरखास्त करून नवीन प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांना पाठविले होते. 

हेही वाचा - ...तरीही फुलवली एचटीबीटी

20 सदस्यीय नंतर 16 सदस्यीय मंडळाची नियुक्ती
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना पाठविलेल्या पत्राच्या अनुषंगाने 4 जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा डॉ.महेंद्र चव्हाण यांनी आदेश काढीत 20 सदस्यीय कार्यरत असलेले अशासकीय प्रशासकीय मंडळ बरखास्त करून मलकापूर बाजार समितीचे कामकाज पाहणेसाठी नवीन 16 सदस्यीय अशासकीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली आहे.

सविस्तर वाचा - झेडपी अडकली कोर्ट कचेरीत

Image result for डॉ.अरविंद कोलते
डॉ.अरविंद कोलते

मुख्य प्रशासक पदी डॉ.अरविंद कोलते
या नियुक्त करण्यात आलेल्या अशासकीय प्रशासकीय मंडळाच्या मुख्य प्रशासक पदी डॉ.अरविंद वासुदेव कोलते यांचेसह प्रशासक म्हणून संतोष साहेबराव रायपुरे, सोपानराव मुक्ताराम शेलकर, गणेश नामदेव चौधरी, शरद संतोषराव मोरे, गजेंद्र भानुदास सोनोने, माधव पर्वतराव गायकवाड, रामराव आत्माराम लाहुडकर (पाटील), प्रविण शांताराम क्षिरसागर, प्रल्हाद हरीभाऊ ढोले, मनोहर बाजीराव खराडे, बाळू ओंकार भिसे, राजेशसिंह मुसाफीरिंसह राजपूत, विजय निवृत्ती साठे, महेश भगवानराव नवले, अ‍ॅड.संजय शंकरराव वानखेडे यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमीत केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dismiss administrative board of malkapur market committee