मनसे शहर-ग्रामीण कार्यकारणी बरखास्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

अमरावती : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज सकाळी आगमन झाल्यानंतर विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्व प्रथम मनसे शहर पदाधिकारी यांच्या सोबत बैठक झाली. त्यानंतर ग्रामीणच्या कार्यकर्त्यांची बैठक ठाकरे यांनी घेतली.

या बैठकीमध्ये ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायगोले यांनी जिल्ह्यातील पक्षात गटातटाचे राजकारण चालते त्यामुळे अमरावती जिल्ह्यात पक्ष माघारत आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीणची कार्यकारणी त्वरित बरखास्त करावी अशी मागणी केली असता राज ठाकरे यांनी त्वरित शहर आणि ग्रामीण कार्यकारणी बरखास्तची घोषणा केली. 

त्यानंतर जिल्ह्याध्यक्ष म्हणून मंगेश पाटील यांची नियुक्ती केली तर दिवाळी नंतर कार्यकारणी घोषित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपल्यावर दिलेली जवाबदारी ही आपण प्रामाणिक पणे पार पाडू व राज ठाकरे यांचे महाराष्ट्र नवनिर्मानचे स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावू असे मत मंगेश पाटील यांनी पत्रकारांशी सोबत बोलतांना व्यक्त केले.

Web Title: Dismissal of MNS city-rural Working Committee