दररोज 20 हजार लिटर पाण्याचे वाटप

आमलाविश्‍वेश्‍वर ः पाण्यासाठी लाइनमध्ये ठेवलेले पिंप.
आमलाविश्‍वेश्‍वर ः पाण्यासाठी लाइनमध्ये ठेवलेले पिंप.

आमलाविश्वेश्वर (अमरावती) ः चांदूररेल्वे तालुक्‍यातील आमलाविश्वेश्वर येथे भीषण पाणीटंचाई आहे. गावकऱ्यांना गुंडभर पाण्यासाठी दररोज भटकावे लागत आहे. ही अडचण पाहून सामाजिक जाण ठेवत श्रीसंत एकनाथ महाराज संस्थान मदतीसाठी पुढे सरसावले. कोणतीही शासकीय मदत न घेता संस्थान मागील दीड महिन्यांपासून आमला गावकऱ्यांना दररोज 20 हजार लिटर पाण्याचे वाटप करीत आहे.
मागील वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे नदी, नाल्यांना पाणी आलेच नाही, त्यातच विहिरींच्या पातळीत वाढ झाली नाही. त्याचा फटका चांदूररेल्वे तालुक्‍यातील आमलाविश्वेश्वर गावाला मोठ्या प्रमाणात बसला. डिसेंबरपासून गावांना पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागत होते. भर उन्हाळ्यात गावातील अनेक विहिरी कोरड्याठण्ण पडल्या आहेत. त्यामुळे गावाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. त्यांना गुंडभर पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत आहे. ही मोठी अडचण लक्षात घेता व सामाजिक जाण ठेवत श्रीसंत एकनाथ महाराज संस्थान गावकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. संस्थानकडे असलेल्या बोअरमधून गावातील गरीब व वंचितांना दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत एका कुटुंबाला 12 पिंप अशाप्रकारे 250 लिटर पाणी दिल्या जात आहे. म्हणजे दररोज 20 हजार लिटर पाण्याचे वाटप होत आहे. याकरिता संस्थानचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र डेरे, उपाध्यक्ष लक्ष्मण हनोते, सचिव दादाराव डोंगरे, विश्वस्त गजानन ढगे, राजाभाऊ डेरे, सुधीर डेरे, अनिल वाठ, भारत डोंगरे यांच्यासह सर्व पदाधिकारी व विश्वस्त सतत झटत आहेत. या मदतीमुळे गावकरी श्रीसंत एकनाथ महाराजांचे व संस्थानचे मनापासून आभार व्यक्त करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com