दोन हजार ८० कोटींचे पीककर्ज वाटप

अमरावती विभाग : यवतमाळ आघाडीवर, जिल्हा मध्यवर्ती बँकांचा मदतीचा हात
Crop loan
Crop loanSakal

अमरावती - खरीप हंगामास सुरवात झाली असून शेतकऱ्यांनी बियाणे व खतांची तजवीज करण्यासाठी बँकांकडे कर्जासाठी चकार मारणे सुरू केल्या आहेत. आतापर्यंत अमरावती विभागातील २ लाख ४३ हजार सभासद शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून कर्ज घेतले आहे. तब्बल २०८० कोटी ३७ लाख रुपयांचे कर्जवाटप बँकेने केले असून या कर्जाऊ रकमेतून ३ लाख ८६ हजार १९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केल्या जाणार आहे.

खरीप हंगाम २०२२-२३ साठी जिल्हा मध्यवर्ती बँकांनी शेतकऱ्यांना कर्जरूपाने मदतीचा हात समोर केला आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत २ लाख ४३ हजार सभासद शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून कर्ज घेतले आहे. या हंगामात २५१३ कोटी ९२ लाख रुपयांचे लक्ष्यांक निश्चित केले आहे. १ जूनपासून कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत जिल्हा बँकांनी २०८० कोटी ३७ लाख रुपये वाटप केले आहेत.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात ८२ टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले असून ३० सप्टेंबरपर्यंत वाटप करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्याने यामध्ये उच्चांक गाठला असून येथील जिल्हा बँकेने ११० टक्के पीक कर्जवाटप केले आहे. त्याखालोखाल अमरावती (८० टक्के), वाशीम (७४ टक्के), अकोला (६९ टक्के) व बुलडाणा (६५ टक्के) कर्जवाटप झाले आहे. राष्ट्रीय व खासगी बँकांनी अजूनही कर्जवाटप करताना हात आखडता ठेवला आहे.

असे आहे कर्जवाटप (रुपये कोटीत व क्षेत्र हेक्टरमध्ये)

जिल्हा लक्ष्यांक क्षेत्र सभासद क्षेत्र टक्के

अमरावती ५५५ ७७२२६ ४७३६८ ४६६ ८०

अकोला ६७५ ८३९४७ ५०९१४ ४६८ ६९

वाशीम ६१५ ९१३५६ ६६९५४ ४५९ ७४

बुलडाणा ७० ९७६४ ६१३३ ४५ ६५

यवतमाळ ५९८ १२३९०३ ८२63६३१ ६५९ ११०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com