esakal | अमरावती : जिल्हा बँक निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह तीन आमदारांच्या उड्या
sakal

बोलून बातमी शोधा

Bacchu Kadu

जिल्हा बँक निवडणुकीत बच्चू कडूसह तीन आमदारांच्या उड्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आता हायहोल्टेज झालेली आहे. वार्षिक दोन हजार कोटींचा टर्नओव्हर असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत राज्यमंत्र्यांसह तीन विद्यमान आमदारांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक चांगलीच चुरशीची ठरणार आहे. ४ ऑक्टोबरला जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे.

शुक्रवारी (ता. ३) शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल तसेच अकोटचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील रंगत चांगलीच वाढली आहे. विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एका राज्यमंत्र्यांसह तीन आमदार थेट लढणार आहे. दुसरीकडे पालकमंत्र्यांसह जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांचा गट सुद्धा आव्हान देण्याच्या स्थितीत आहे. एकूणच जिल्हा बँक निवडणुकीनिमित्त जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.

हेही वाचा: पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

शुक्रवारी उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादीचे पदाधिकारी संजय खोडके, जि.प.च्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांचाही समावेश आहे. बँकेच्या २१ संचालकपदासाठी आतापर्यंत उमेदवारांचे व्दिशतक पूर्ण झाले आहे. ११ वर्षांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठी विरोधकांनी बांधलेली मोट जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

दिग्गजांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज पाहता अनेक मतदारसंघात आमदार विरुद्ध आमदार, राज्यमंत्री विरुद्ध आमदार तसेच जिल्हा परिषदेच्या सभापतींमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे. सोमवारी (ता. ६) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर खरेच चित्र स्पष्ट होणार आहे. अद्याप कुठल्याही पॅनेलकडून उमेदवाराची घोषणा झालेली नसली तरी पॅनेलच्यावतीने अनेकांनी उमेदवारी दाखल केली आहे.

हेही वाचा: पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबत युतीचा विचारही मनात नाही; मात्र...

...तर तिसरी आघाडी

दोन तगड्या पॅनेलमध्ये यंदा काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. दोन्ही पॅनेलकडून उमेदवारीची आशा असलेल्या अनेकांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. वेळेपर्यंत उमेदवारी न मिळाल्यास तिसऱ्या पॅनेलचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो अशी चर्चा आहे.

loading image
go to top