esakal | काहींना ‘दिवाळी’ भारी पडणार; अवैध वाळूतस्करांसह अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर
sakal

बोलून बातमी शोधा

District Collector against illegal sand smuggling

आता सूचना देऊन झाल्यानंतरही त्यावर आळा बसलेला नाही. परिणामी, आता थेट कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे ऐनदिवाळीत काही अधिकाऱ्यांना ‘फटाके’ लागण्याची शक्यता आहे. वणी, पांढरकवडा, उमरखेड व महागाव या भागात वाळूतस्करीचे प्रकरणे समोर येत आहेत.

काहींना ‘दिवाळी’ भारी पडणार; अवैध वाळूतस्करांसह अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यातील वाळूघाटांचा लिलाव अद्यापपर्यंत झालेला नाही. असे असतानाही खुलेआम वाळूचा उपसा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी घाटांची गोपनीय पद्धतीने पाहणी करून घेतली. त्यात काही ठिकाणी वाळूतस्करांचा स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संबंध असल्याचे दिसून आले. त्यामुळेच आता जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी थेट संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत. परिणामी, काहींवर ‘दिवाळी’ भारी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळूउपसा प्रकरणाची जिल्हाधिकारी सिंह यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. वाळूघाटांचा लिलाव झालेला नसतानादेखील सर्रासपणे वाळूचा उपसा राजरोसपणे सुरूच आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले असतानाही ठोस कारवाई झालेलीच नाही.

अधिक माहितीसाठी - खासदार नवनीत राणा धडकणार मातोश्रीवर; मुख्यमंत्री पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व वाळूघाटांची गोपनीय पद्धतीने पाहणी करून अहवाल मागविला होता. त्यात काही वाळूघाटांवर तस्करांसोबतच अधिकाऱ्यांचेदेखील हितसंबंध असल्याची बाब समोर आली आहे.

आता सूचना देऊन झाल्यानंतरही त्यावर आळा बसलेला नाही. परिणामी, आता थेट कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे ऐनदिवाळीत काही अधिकाऱ्यांना ‘फटाके’ लागण्याची शक्यता आहे. वणी, पांढरकवडा, उमरखेड व महागाव या भागात वाळूतस्करीचे प्रकरणे समोर येत आहेत. या तालुक्यांत अनेक ठिकाणी वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याचे निर्देशनास आले आहे.

परवानगी नसतानाही सुरू असलेल्या अवैध वाळूउपसावर जिल्हाधिकाऱ्यांनी फोकस केला आहे. वाळू उपसाने पर्यावरणावर परिणाम होत आहे. कुठलेही नियम न पाळता उपसा सुरू आहे. त्यामुळे आता वाळूतस्करांवर कारवाई तर केली जाणार आहेच, शिवाय त्यांना पाठिशी घालणाऱ्यांना आता कारवाईला सामोरेही जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा - ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिघा भावांचे मृतदेह बघून अख्खे गाव हळहळले; तलावात बुडून झाला मृत्यू

चार तालुक्यांत सर्रास उपसा

जिल्ह्याभरातील घाटांवरूनच वाळूची तस्करी केली जात आहे. असे असले तरी चार तालुक्यांतून थेटपणे वाहतूक सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या गोपनीय पाहणीत समोर आले आहे. त्यामुळेच हे चार तालुके जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर आहे. त्यामुळे या ठिकाणी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे