esakal | अचलपूर: जिल्हानिर्मितीचा मुहूर्त चाळीस वर्षांपासून सापडेना
sakal

बोलून बातमी शोधा

achalpur

अचलपूर: जिल्हानिर्मितीचा मुहूर्त चाळीस वर्षांपासून सापडेना

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर : अचलपूर जिल्ह्याच्या मागणीला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु अद्यापपर्यंत या मागणीला यश आले नाही. कोरोनाचे संकट पाहता चार शकांपूर्वीची मागणी याहीवर्षी पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे अचलपूर जिल्हा निर्मितीचा प्रश्न कधी मार्गी लागणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा: वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार; चंद्रपूर जिल्ह्यातील मारोडा येथील घटना

अचलपूर जिल्हानिर्मितीसाठी प्रशासकीय स्तरावरून २०१५ मध्ये शासनाकडे जो प्रस्ताव सादर करण्यात आला होता, त्यात अचलपूर, चांदूरबाजार, अंजनगाव, चिखलदरा, धारणी या पाच तालुक्यांसह आसेगाव पूर्णा आणि चुरर्णी या प्रस्तावित तालुक्यांचा प्रस्तावित अचलपूर जिल्ह्यात समावेश आहे. खरे तर अचलपूर जिल्हा व्हावा ही मागणी १९८० पासूनची आहे. माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, हरिशंकर अग्रवाल आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी त्यावेळी या मागणीच्या अनुषंगाने शासनाकडे निवेदने सादर केली होती. यासाठी सर्वपक्षीय नागरिक कृती समितीही स्थापन करण्यात आली होती.

विशेष म्हणजे राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार असताना वसुधा देशमुख यांनी सदनातच उपोषण सुरू केले होते. त्यानंतर १९९८ मध्ये तत्कालीन विधान परिषद सदस्य बी.टी. देशमुख यांनीही या प्रस्तावाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. आता आमदार बच्चू कडू विधानसभेत अचलपूरचे प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे ते आता सरकारचा भाग असून मंत्री पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी अचलपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार युवाशक्तीने ऐन दिवाळीच्या दिवशी ७ नोव्हेंबर ९९ ला अचलपूर उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले होते.

हेही वाचा: अमरावती : मृत बाळ जन्मल्यानंतर महिला गेली पळून

यानंतर ८ नोव्हेंबरपासून तब्बल ४२ दिवस साखळी उपोषण केले होते. यामध्ये १५५ गावांतील युवकांनी सहभाग नोंदविला होता. पुढे बच्चू कडू यांनी अचलपूर जिल्ह्यासह १९ मागण्यांकरिता २२ सप्टेंबर २००८ रोजी नागरवाडीत अन्नत्याग आंदोलन केले होते. हे आंदोलन करून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी त्यांचे अन्नत्याग आंदोलन सोडवले होते. या मागणीचा गांभीर्याने विचार करू असे आश्वासनही त्यांनी दिले होते. पण त्यानंतर दोन्ही सरकारकडून काहीच हालचाली झाल्या नाहीत हे विशेष.

मेळघाटच्या दृष्टीने आवश्यक

अमरावती जिल्ह्यात मेळघाट हा आदिवासीबहुल भाग असून चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ-चुर्णी परिसरात जवळपास ६० गावांचा समावेश आहे. मध्यप्रदेश सीमारेषेवर असलेल्या चुरणी परिसराला तालुका घोषित करण्याची मागणी गेल्या दहा वर्षांपासून केली जात आहे. एकंदर जिल्ह्यात आता तीन नवीन तालुक्यांची मागणी व अचलपूर जिल्ह्याची मागणी होत आहे. अमरावती जिल्ह्यात १४ तालुके आहेत जिल्ह्याचा व्याप मोठा आहे. विभागीय मुख्यालयाचे ठिकाण असतानाही मेळघाटातील धारणी, चिखलदरात कुपोषणाची स्थिती आजही भीषण आहे.

loading image
go to top