गडचिरोलीत जिल्हा हिवताप अधिकाऱ्याला लाच घेताना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

लाच लुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने गडचिरोलीच्या जिल्हा हिवताप अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.

गडचिरोली - साडेसहा हजाराची लाच घेताना जिल्हा हिवताप अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने बुधवारी (ता. 21) रंगेहाथ पकडले. डॉ. शिवशंकर जगदेबाप्रसाद पांडे असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. 
जिल्हा हिवताप कार्यालयांतर्गत कार्यरत एका आरोग्य कर्मचाऱ्याने एप्रिल 2017 ते फेबुरवारी 2018 दरम्यान जिल्हाच्या अनेक भागात आरोग्य सेवेसाठी दौरा केला होता. या दौऱ्याचा खर्चाचे बिल मंजूरीसाठी कार्यालयात सादर केले होते. परंतु सदर बिल मंजूरीसाठी दहा हजार रुपये वरिष्ठांना द्यावे लागेल असे कर्मचाऱ्याला सांगण्यात आले. पैसे दिल्याशिवाय बिल मंजूर होणार नाही, अशी तंबीही देण्यात आली. परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने संबंधित कर्मचाऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून डॉ. पांडे यांना लाच घेताना अटक केली.

Web Title: District Magistrate arrested for taking bribe in gadchiroli