esakal | Diwali Festival 2020 : विदर्भात दिवाळीमध्ये करतात पांडवांची पूजा, झाडीपट्टीतील नाटकांचाही असतो जल्लोष
sakal

बोलून बातमी शोधा

diwali celebration in vidarbha

साधारण वसुबारसला दिवाळीचा पहिला दिवस मानतात. या दिवशीपासून ग्रामीण भागात शेणाचे पाच पांडव तयार करून ते अंगणात थापले जाते. गावात घरोघरी हे पांडव पाहायला मिळतात.

Diwali Festival 2020 : विदर्भात दिवाळीमध्ये करतात पांडवांची पूजा, झाडीपट्टीतील नाटकांचाही असतो जल्लोष

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर - दिवाळीचा सण शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या सणाचा गोडवा या आधुनिकीकरणाच्या काळातही कायम आहे. अजूनही त्याच परंपरा सुरू आहेत. त्यातच विदर्भात साजरा होणाऱ्या दिवाळीचा विचार केल्यास ही दिवाळी नेहमीच खास असते. दिवाळीच्या पाच दिवसांत याठिकाणी पांडवांची पूजा केली जाते. त्यात मुख्य दिवस असतो लक्ष्मीपूजनाचा. मात्र, यंदा चार दिवसांची दिवाळी आली आहे. रविवार (ता. १५)हा भाकड दिवस असून दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आली आहे. 

हेही वाचा -

वसुबारस - साधारण वसुबारसला दिवाळीचा पहिला दिवस मानतात. या दिवशीपासून ग्रामीण भागात शेणाचे पाच पांडव तयार करून ते अंगणात थापले जाते. गावात घरोघरी हे पांडव पाहायला मिळतात. सकाळीच दूध किंवा दही भात शिंपडून त्या पांडवांची पूजा केली जाते. 

इथल्या कृषिप्रधान संस्कृतीचे हे ठळक वैशिष्ट्य आहे. वर्षभर बैलांच्या भरवश्यावर शेती कसली जाते. त्याच बैलांना जन्म देणारी माऊली म्हणजे गाय. त्यामुळे तिची वसुबारच्या दिवशी पूजा केली जाते. पाडस असलेल्या गाईला विशेष महत्व असते. गाईंच्या वाट्याला दिवाळी दोनवेळा येते, एक वसुबारस आणि दुसरी बलिप्रतिपदेला. त्यामुळेच यावर काही चारोळी पण आपण ऐकल्या आहेत.

दिन दिन दिवाळी
गायी, म्हशी ओवाळी
गायी, म्हशी कोणाच्या
राम, लक्ष्मणाच्या...

हेही वाचा -

धनत्रयोदशी -
धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीपूजनाचा आदला दिवस. याला धनतरेसही म्हणतात. याबाबतही एक आख्यायिका आहे. सोळाव्या वर्षी हेमा राजाचा पूत्र मरणार असल्याने त्याचा विवाह लवकर केला जातो. मृत्यू ज्या दिवशी सांगितलेला असतो त्या दिवशी त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. उलट, त्याच्या महालात सुवर्णमोहरा ठेवते. महाल दिवे लावून प्रकाशमान ठेवला जातो. यम तेथे येतो तेव्हा दिपून जातो आणि राजकुमाराचे प्राण वाचतात. या दिवसाला यमदीपदान म्हणण्यामागे ही आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळेच दक्षिण दिशेस या दिवशी दिवा लावतात. अप्रत्यक्षपणे आरोग्याशीच संबंधित ही कथा आहे. याच दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. देव-दानवांच्या अमृतमंथनात धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन आल्याची कथा सर्वश्रुत आहे. आयुर्वेद व अन्य पारंपरिक वेदाचार्य धन्वंतरीचे पूजन करतात.

हेही वाचा - महाविकास आघाडीत बिघाडी; काँग्रेसने उमेदवार दिल्यावरही...

नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन -
हे दोन्ही सण साधारपणे एकाच दिवशी असतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उत्साह ओसंडून वाहत असतो. हा दिवाळीचा मुख्य दिवस. यादिवशी अंगणात रांगोळी काढतात. घर, दुकान, कार्यालयाला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते. झेंडूच्या फुलांचे हारांनी घर सजवले जाते. सायंकाळी घरोघरी मातीच्या लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा केली जाते. लक्ष्मीसोबतच गणपती, सरस्वती यांच्या चित्रांची, फोटोंची पूजा करतात. विदर्भात केरसुणी म्हणजेच फड्याला लक्ष्मीचे रुप मानले जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फड्याचीही पूजा केली जाते.
घरातील दागिने, पैसे यांचीही पूजा करतात. व्यापारी वहीखाते, चोपड्यांची, अवजारांची पूजा करतात. देवासमोर फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. पूजेनंतर घरातील मोठ्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. पूजेनंतर फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.

हेही वाचा -हॉटेल, लॉज मालकांनो रेकॉर्ड अपडेट ठेवा; अन्यथा होणार...

बलिप्रतिपदा -
लक्ष्मीपूजनाचा दुसरा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. पण, यंदा हा सण रविवारी न येता सोमवारी आलाय. बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आलीय. त्यामुळे बलिप्रतिपदेला शेतकरी गाई, म्हशी, शेळ्यांना रंगवतात. त्यांना गोडधोड खाऊ घालतात. त्यानंतर यंदा रात्री भाऊबीजेचा मुहूर्त आहे. बहीण-भावाच्या नात्यातील गोडवा गाणारा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिणी भावाला ओवाळण्यासाठी माहेरी जातात. आधी चंद्राला ओवाळले जाते. त्यानंतर भावाला ओवाळतात. 

हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : अनेक दिग्गज रिंगणात...

झाडीपट्टीतील मंडई उत्सव -
दिवाळीच्या झाल्यानंतर झाडीपट्टीतील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर जिल्ह्याच्या काही भागात गावागावात मंडईचा उत्सव असतो. ही मोठी जत्रा असून यामध्ये झाडीपट्टी नाटकांचा जल्लोष असतो. या दिवसात हंगामातील पीक हाती आलेले असते. त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिक हा उत्सव साजरा करतात. यामध्ये झाडीबोलीतील नाटके, दंडार, खडीगंमत अशा लोककलांच्या माध्यमातून प्रबोधन केले जाते.