अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : अनेक दिग्गज रिंगणात, अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

last day to file nomination form in amravati teacher constituency election

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे गुरुवारी (ता.12) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीत 18 ते 20 उमेदवार राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असून त्यात वेळेपर्यंत वाढ होण्याचे संकेत आहेत.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : अनेक दिग्गज रिंगणात, अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीने आता जोर धरला आहे. दिग्गजांचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, गुरुवारी (ता.12) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी चांगलीच गर्दी होणार आहे. 

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे गुरुवारी (ता.12) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीत 18 ते 20 उमेदवार राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असून त्यात वेळेपर्यंत वाढ होण्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या या निवडणुकीत गेल्या निवडणुकीत रिंगणात असलेले केवळ दोनच उमेदवार आहेत. त्यात महाविकास आघाडीचे प्रा. श्रीकांत देशपांडे तसेच शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांचा समावेश आहे. अन्य सर्व उमेदवार नवे आहेत. सोबतच या निवडणुकीत शिक्षण संघर्ष संघटनेच्या संगीता शिंदे या एकमेव महिला उमेदवार सध्यातरी दिसत आहेत. 

हेही वाचा - अमेरिकेतील मराठमोळे आमदार ठाणेदार यांनी नागपूरला दिली होती भेट, सुरेश भट सभागृहात गाजलेला डायलॉग...

आतापर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांमध्ये विकास सावरकर, प्रवीण ऊर्फ पांडुरंग विधळे, सुनील पवार, संजय आसोले, अविनाश बोर्डे, शरदचंद्र हिंगे, संगीता शिंदे-बोंडे, राजकुमार बोनकिले, प्रकाश काळपांडे, दिलीप निंभोरकर, विकास सावरकर, डॉ. नितीन धांडे, चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर, सतीश काळे, प्रा. विनोद मेश्राम आदींचा समावेश आहे. त्यात शेवटच्या दिवशी दिग्गजांसह प्रमुख उमेदवारांची भर पडण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा -  'यो यो रॅप सॉंग' ;चांदूररेल्वेचा तेजस जपतोय शिक्षणासोबत रॅपिंगचा छंद

शुक्रवारी अर्जांची छाननी -
शुक्रवारी (ता. 13) उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर असल्याने कोणकोण रिंगणात राहणार हे त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे खऱ्या अर्थाने फटाके फुटणार आहेत. 

हेही वाचा - भंडारा जिल्ह्यातील नगरपंचायतीला लागले निवडणुकीचे वेध, आरक्षण झाले जाहीर

शिक्षक संघटना सरसावल्या -
शिक्षकांच्या विविध संघटना या निवडणुकीच्या निमित्ताने चांगल्याच सरसावल्या आहेत. कोणत्या संघटनेच्या उमेदवाराचा जोर राहील याची चाचपणीसुद्धा शिक्षकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढली आहे. 
 

Web Title: Last Day File Nomination Form Amravati Teacher Constituency Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top