सरकारी कार्यालयांत दिवाळी; कर्मचारी नसताना दिवे, पंखे सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खनिकर्म, मत्यव्यवसाय, रस्ते प्रकल्प, पुरवठा, निवडणूक इत्यादींसह अनेक विभाग आहेत. असंख्य कर्मचारी या विभागांमध्ये कार्यरत आहेत. प्रत्येक विभागात वीज बचतीबाबत सूचना फलक लावण्यात आलेले आहेत. मात्र, त्या सूचना फलकांकडे कर्मचारी साफ दुर्लक्ष करीत आहेत. अनेक कार्यालयांतील कर्मचारी बाहेर जाताना दिवे, पंखे बंद करण्याचे विसरतात.

यवतमाळ : आवश्‍यकता नसताना विद्युत दिवे, पंखे बंद करावेत, अन्यथा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वीज देयकाची रक्कम भरणा करण्यात येईल, असे आदेश असताना अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कोणीही कर्मचारी नसताना तेथील दिवे, पंखे सुरूच राहत असल्याचे एका पाहणीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये दिवाळी सुरू आहे की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खनिकर्म, मत्यव्यवसाय, रस्ते प्रकल्प, पुरवठा, निवडणूक इत्यादींसह अनेक विभाग आहेत. असंख्य कर्मचारी या विभागांमध्ये कार्यरत आहेत. प्रत्येक विभागात वीज बचतीबाबत सूचना फलक लावण्यात आलेले आहेत. मात्र, त्या सूचना फलकांकडे कर्मचारी साफ दुर्लक्ष करीत आहेत. अनेक कार्यालयांतील कर्मचारी बाहेर जाताना दिवे, पंखे बंद करण्याचे विसरतात. यात विजेचा अपव्यय होत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून लावलेले सूचना फलक भिंतीची शोभा वाढविण्यासाठी लावले आहेत काय, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali in Government Offices; Lamps without staff, ceiling fan